पुसद (Pusad VidhanSabha elections) : राज्याच्या राजकारणामध्ये पुसद तालुक्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या तालुक्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक ओळख व एक अस्तित्व निर्माण केलेले होते. दुर्गम भागातून येत असलेल्या पुसद तालुक्यासारख्या भागातून कर्तबगार दोन मुख्यमंत्री दिलेत. ज्यांनी आपल्या कार्यशैलीतून राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा दिली. ते हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व जलसंधारण परिषदेचे अध्यक्ष कै. सुधाकरराव नाईक यांच्यानंतर मात्र पुसद तालुक्याला त्या काळात लोकनेते म्हणून परिचित असलेले माजी मंत्री मनोहर नाईक (Manohar Naik) यांनी मंत्री म्हणून पुसदची धुरा सांभाळली.
त्यांच्या वीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या सहकारी संस्था, जिनिंग प्रेसिंग, साखर कारखाने हे मात्र ते सांभाळू शकले नाही, जोपासू शकले नाही, त्यामुळे पुसद तालुक्यातील 60 टक्के लोकांना उदरनिर्वाह करण्यासाठी पर राज्यात , ऊस तोडी गवंडी काम करण्याकरिता परिवारासह जावे लागले. कुठलेही मोठे औद्योगिक युनिट मात्र पुसद तालुक्याला मिळाले नाही. त्यामुळे तालुक्यातील गोरगरिबांना रोजगार प्राप्त होऊन ते सुखी व समाधानी होतील. त्यानंतर त्यांचे कनिष्ठ चिरंजीव यांना पुसद विधानसभेची उमेदवारी देऊन आपले ज्येष्ठ पुत्र यांच्यावर मात्र त्यांनी अन्याय केल्याची भावना ज्येष्ठ पुत्रांच्या मनामध्ये निर्माण झाली. विद्यमान आमदार यांना गत (Pusad VidhanSabha elections) निवडणुकीमध्ये नाईक कुटुंबातीलच जे भारतीय जनता पक्षाकडून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे ठाकले होते. त्यांच्याशी लढत द्यावी लागली होती.
मात्र त्यापूर्वीच भाजपाने त्या (Manohar Naik) नाईक परिवारातील व्यक्तीला विधान परिषदेची आमदारकी बहाल केली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये अत्यंत चुरस असताना व मतदार परिवर्तनाच्या मानसिकतेत असताना मात्र दगा फटका घडला आणि 9000 च्या फरकाने विद्यमान आमदारांचा विजय झाला. मात्र यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चित्र हे वेगळे आहे. ज्येष्ठ पुत्र यांनी बंडखोरी केली. तर विधान परिषदेचे माजी आमदार हे शरीराने गरीब विद्यमान आमदार सोबत दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र ते त्यांच्यासोबत या निवडणुकीमध्ये दिसणार नाहीत. अशी राजकीय विश्वात ती चर्चा सुरू आहे. गत लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला राज्यामध्ये भरघोस यश प्राप्त झाले होते. त्याचा धसका घेत यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी कडून पुसद विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी पहिल्यांदाच 9 इच्छुकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रमुख शरद चंद्र पवार यांच्याकडे अर्ज केले होते.
चाणक्य बुद्धी असलेले शरदचंद्र पवार यांनी मात्र (Pusad VidhanSabha elections) विधानसभेची उमेदवारी देताना परिवर्तन घडवून आणणारा, जनसंपर्क व आर्थिक सक्षमता असणारा अशा उमेदवाराला प्राधान्य दिले. जन माणसांच्या डोक्यामध्ये प्रचंड परिवर्तनाची हवा घुसलेली आहे, मतदार जागृत आहे, भविष्यात आपल्या लेकरा बाळांच्या विचार करण्याकरिता आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये विकासाची दुरुस्ती असणारा, सर्व सामान्य माणसांना सोबत घेऊन चालणारा उमेदवार महाविकास आघाडीने दिलेला आहे. त्याच्या माध्यमातून पुसद विधानसभेमध्ये मात्र परिवर्तन होणारच… अशी भावना पुसद विधानसभेतील मतदारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. हे विशेष. चौकट पोटात घेणे – लोकनेते मनोहर नाईक शेवटी मतदारांना कोणता गुप्त संदेश देतात. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहे. सर्व उमेदवारांचे फोटो घेणे.