लाभार्थ्याची तक्रार
मानोरा (PM Awas Yojana) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या यादीत पंचायत समिती स्तरावर फेरफार करण्यात आल्याचा आरोप लाभार्थी प्रवीण राठोड यांनी केला आहे. त्यांच्या मते, योजनेत त्यांचे नाव ६१ व्या क्रमांकावर होते, परंतु यादीत संशयास्पदरीत्या त्यात बदल करण्यात आल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आहे.
या संदर्भात त्यांनी आपल्या तक्रारीचे निवेदन संबंधित पोर्टलवर सादर केले असून, अमरावती विभागीय आयुक्त यांनी याची दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांमध्ये पारदर्शकता राखली जावी, लाभार्थ्यांच्या नावांमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ नये, आणि (PM Awas Yojana) गरजू लाभार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी अनेकांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. प्रशासनाने याची तत्काळ चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा.
या प्रकरणावर पंचायत समिती प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, संबंधित यादीतील फेरफार आणि अनियमितता असल्याचा आरोप होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती मानोरा यांच्या प्रतिक्रिया घेण्याचे प्रयत्न केले. मात्र भेट होऊ शकली नाही. (PM Awas Yojana) प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामिन विकास यंत्रणा यांनी गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन याबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल मागितला आहे.
घरकुल योजना (PM Awas Yojana) घरकुल मंजूर करून देतो अशी बातावनी करून काही दलाल ग्रामीण भागात भोळ्या ,भावड्या जनतेला आमिष देऊन लूट करीत आहे . पंचायत समितीमध्ये तर काही कर्मचारी काम न करताच पैसे देऊन लोकांन कडून खुले आम लाच घेत असल्याची चर्चा आहे.यावर वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.