परभणीच्या सेलू तालुक्यातील पिंपळगाव गोसाई येथील घटना
परभणी/चारठाणा (Charthana Crime) : सेलू तालुक्यातील पिंपळगाव गोसाई येथील एका मतिमंद (Charthana Crime) अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मंगळवार ६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता घडली होती. या प्रकरणी (Charthana Police) चारठाणा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, आरोपी महादु बुधवंत वय ६५ वर्ष रा.पिंपळगाव गोसाई हा अल्पवयीन मुलीच्या घरासमोर राहतो. मुलीच्या घरातील लोक शेतात जातो म्हणून गावातील झुडपात लपून बसले होते. या संधीचा फायदा घेत आरोपी महादु बुधवंत यांनी घरातील मतिमंद अल्पवयीन मुलीस बोलावून अश्लील चाळे (Charthana Crime) करू लागला. यावेळी घरातील लोकांनी ओरडा करत दार उघड म्हणताच आरोपी दार उघडून पळून गेला.
या प्रकरणी माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, सपोनि. प्रभाकर कापुरे, पोउपनि. आसमान शिंदे, बीट जमादार दत्ता भदर्गे, जमादार सिध्दार्थ आचार्य आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या अल्पवयीन मतिमंद मुलीवर उपचार चालू आहेत. घटनेची तक्रार दौलतराव दराडे यांनी दिली आहे. तक्रारीवरून आरोपी महादु बुधवंत याच्यावर (Charthana Police) चारठाणा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल (Charthana Crime) करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि. आसमान शिंदे करीत आहेत.