कांकेर(Chattisgadh):- छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. मंगळवारी सुरक्षा दलांनी एका चकमकीत आठ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या एका महिला नक्षलवाद्याला ठार केले. कांकेर जिल्हा पोलिस अधीक्षक (एसपी) इंदिरा कल्याण अलसेला यांनी सांगितले की, छोटाबेथिया पोलिस स्टेशन हद्दीतील बिनागुंडा गावाजवळील जंगलात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी (security guard) महिला नक्षलवादी रीटा मडियामचा खात्मा केला आहे. रिटा मडियाम 30 वर्षांची होती आणि ती भयानक नक्षलवाद्यांपैकी एक होती.
घटनास्थळाची झडती घेतली असता तेथे एका महिला नक्षलवाद्याचा सापडला मृतदेह
जिल्हा राखीव रक्षक (DRG), बस्तर फायटर्स आणि सीमा सुरक्षा दल (BSF) चे संयुक्त पथक छोटाबेठिया पोलीस स्टेशन परिसरात गस्तीसाठी पाठवण्यात आले होते. ही टीम बिनागुंडा गावाच्या जंगलात असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्यांनी सांगितले की, यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले आणि दोन्ही बाजूंनी काही वेळ गोळीबार (firing) केल्यानंतर नक्षलवादी (Naxalite)तेथून पळून गेले. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांनी घटनास्थळाची झडती घेतली असता तेथे एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. अलेसेला यांनी सांगितले की, महिला नक्षलवादीचे नाव रीटा मडियाम असे असून ती पीएलजीए मिलिटरी कंपनी क्रमांक 5 ची सदस्य होती तिच्यावर 8 लाख रुपयांचे बक्षीस होता.