राज्य शासनातर्फे करण्यात येणार सन्मान
नागपूर (Divya Deshmukh) : नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख (Divya Deshmukh) यांनी किशोरवयातच जागतिक बुद्धिबळस्पर्धेत विजेतेपद पटकावले असून ‘ग्रँड मास्टर’ हा किताब मिळविला आहे, त्यांची ही कामगिरी अभिमानास्पद असल्याचे सांगून राज्य शासनाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याचे (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
गर्व और खुशी का क्षण!
नागपुर की होनहार बेटी दिव्या देशमुख इन्होंने कम उम्र में प्रतिष्ठित अंतरराष्ट्रीय शतरंज टूर्नामेंट 'फिडे महिला विश्व कप' का खिताब जीतकर देश और महाराष्ट्र का गौरव बढ़ाया है। हमारी सरकार जल्द ही दिव्या देशमुख इनका सम्मान करेगी।
(पत्रकार परिषद | नागपूर |… pic.twitter.com/6SzGeNYIvw
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 28, 2025
रामगिरी शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. (Divya Deshmukh) दिव्या देशमुख यांनी भारतीय बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी यांना जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत करून ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. कोनेरू हम्पी यांचे अभिनंदन करत दिव्या देशमुख यांनी दुसऱ्यांदा या स्पर्धेत सहभाग घेत यशोशिखर गाठल्याचे त्यांनी सांगितले. दिव्या देशमुख यांनी वयाच्या १९ व्या वर्षी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांनी आतापर्यंत विविध स्पर्धेत २३ सुवर्ण पदकांसह जवळपास ३५ पदके पटकावली आहेत.
Our Nagpur’s Divya Deshmukh Creates History at the 2025 FIDE Women’s World Cup – India’s 88th Grandmaster!
Congratulations to GrandMaster Divya Deshmukh!
At just 19, she has conquered the 64 squares, becoming India’s 88th Grandmaster and 1st Indian Woman to achieve the title !… pic.twitter.com/e3KLPYolAQ— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 28, 2025
दिव्या देशमुख (Divya Deshmukh) यांच्या या कामगिरीचा राज्य शासनाच्या वतीने सन्मान करण्यात येईल. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.