छत्रपती संभाजीनगर (One Country, One Constitution) : देशात नागरिकांना एकसंघ ठेवण्यासाठी कश्मीरमध्ये 370 कलम हटवून राष्ट्रीय विचाराची विचारधारा देणारा पक्ष ही आमची विचारधारा असल्याचे मत तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री ऍड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी व्यक्त केले.
इंदिरा म्हणजे इंडिया ही विचारसरणी…
मागच्या वर्षी काश्मीरमध्ये निवडणुका झाल्या. त्यात उमर अब्दुल्ला यांनी प्रथमच राज्यघटनेवर हात ठेवून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हि खरी राष्ट्रीय विचारसरणी आणि राष्ट्रीय विचार ते राजकीय (Political) प्रवास मनावा लागेल. तसेच काँग्रेसने मुस्लिमलीग धर्मनिरपेक्षतेच्या (Secular) नावाखाली शहरी नक्षलवाद पोसाला. त्या जीवावर कोणतीही विषय कोणतीही विशिष्ट विचारसरणी आजही ते विकसित करू शकलेले नाहीत. इंदिरा म्हणजे इंडिया (India) ही विचारसरणी काँग्रेसने आजवर पोसली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रीय तसेच राष्ट्रवादी विचारसरणीशी कोणताही संबंध राहिला नाही नसल्याचेही यावेळी शेलार यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात (Freedom Struggle) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच नंतरच्या जनसंघातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारखे निष्ठावंत नेतृत्वाने भारतात राष्ट्रीय व राष्ट्रवादी विचारसरणी जपली आणि वाढवली देखील. आज काल शिवसेना (उभाठा) आणि मनसे यासारखे पक्ष प्रतिक्रिया वादी तसेच प्रतिहल्ले वादी बनले आहेत. आणि ते हो बाबत जपून करत स्वतःचा उर बडून घेण्याचे काम करत आहेत.
हिंदुस्थानात राजकीय पक्षावरील विश्वासहारता नष्ट होत चालली आहे…
कोणत्याही राजकीय पक्षांना आज राष्ट्रीय, राष्ट्रवादी (Nationalist) विचारसरणी असलेले दिसत नाही. यामुळे आज हिंदुस्थानात राजकीय पक्षावरील विश्वासहारता नष्ट होत चालली आहे. भारतीय संविधानाची तोडफोड करून निगेटिव्ह तयार करून काँग्रेसने (Congress) राष्ट्रीय तसेच राष्ट्रवादी विचारसरणीला तिलांजली देण्याचे पाप केले आहे. या फेक निगेटिव्हचा कोणताही परिणाम मागच्या वर्षी झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकात (Assembly Elections) दिसून आला नाही. असेही मंत्री शेलार यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पगारिया ऑटोचे संचालक राहुल पगारिया, मराठवाडा युतक विकास मंडळाचे सचिव? ड. अरविंद केंद्रे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. नामदेव कराड, संजय खनाळे, पद्य. राजू पुसेकर तर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् तृप्ती वाटेगावकर यांनी गायले. यावेळी तिन्ही दिवस शहरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.