मराठवाडास्तरीय महत्वपूर्ण बैठक : मान्यवरांचे होणार मार्गदर्शन
लातूर (OBC Elgar Andolan) : ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण वाचविण्याच्या आंदोलनाची (OBC Elgar Andolan) पुढील दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी (दि. १० ऑक्टोबर) ११ वाजता छत्रपती संभाजीनगर येथे भानुदास नाट्यगृहात महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या बैठकीला बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, मंत्री मा. ना. छगनराव भुजबळ, मंत्री मा. ना. पंकजाताई मुंढे, माजी मंत्री धनंजय मुंढे, विरोधी पक्षनेते मा. ना. विजय वडेट्टीवार, अॅड. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
ओबीसी व भटके विमुक्त समाजातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना नम्रपणे आवाहन करण्यात येते की, राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाचा विषय धगधगत असून (OBC Elgar Andolan) मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे आंदोलन करुन जातीच्या जोरावर भाजप, अजित पवार राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांना ओबीसी आरक्षणामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास भाग पाडले आहे. फडणवीस सरकारने २ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाडा विभागात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
वास्तविक पाहता ही बाब असंवेधानिक असून ओबीसी व भटके विमुक्तांवर अन्याय करणारी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे परंतु त्यांचं आरक्षणाचं ताट वेगळं आणि ओबीसींचं आरक्षणाचं ताट वेगळं ही संविधानिक भूमिका गेल्या अनेक वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी जोरकसपणे मांडली आहे. परंतु, २ सप्टेंबर २०२५ चा शासन निर्णय हा ओबीसी व भटके विमुक्त यांच्या आरक्षणाची वाट लावणारा आहे.
त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले आरक्षण गेल्यात जमा आहे. ते पुढच्या पिढ्यांसाठी वाचवायचे असेल तर एकटे एकटे लढून उपयोग नाही. त्यासाठी जातीच्या संख्येला घाबरून असंविधानिक निर्णय घेणाऱ्या फडणवीस सरकारला वाकवणारी व शासन निर्णय मागे घेणारी ओबीसी भटके विमुक्तांची ताकद उभी करावी लागेल. त्यामुळे पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आपल्या (OBC Elgar Andolan) समाजाच्या आरक्षणासाठी ओबीसी व भटके विमुक्त समाजातील सामाजिक संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


