हिंगोली (Chhatrapati Shivaji Maharaj) : शेजारी असलेल्या राजकोट येथे मागील आठ महिन्यापुर्वीच (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. परंतु हा पुतळा कोसळुन पडला असल्याने या घटनेचा (Maratha community) सकल मराठा समाजाच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त करुन निषेधाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे. यातील दोषीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार दि.२८ ऑगस्ट रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांना निषेध निवेदन देण्यात आले. या निवेदनात सिंधुदुर्ग शेजारी राजकोटवर आठ महिन्यापूर्वी उभारलेला (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एकाएकी कोसळून पडतो ही अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी घटना आहे. या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले होते. भारतीय नौदलाच्या अखत्यारीत या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडावा हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे.
त्याचबरोबर हा (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली, कर्तुत्ववान इतिहासाचा सुद्धा घोर अवमान आहे. या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपण अतिशय गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन घटनेसाठी दोषी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधितावर ताबडतोब कठोर कारवाई करावी, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी (Maratha community) सकल मराठा समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.