बुलढाण्यातला शिवजयंती सोहळा बनलायं लोकोत्सव- ना. मकरंद पाटील
बुलढाणा (Chhatrapati Shivaji Maharaj) : छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती बुलढाण्याच्या (Sampark Office) “शिवसंपर्क” कार्यालयाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवार २५ जानेवारी रोजी शिवस्मारक परिसरात पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बुलढाण्यातला सार्वजनिक शिवजयंती सोहळा लोकोत्सव बनला असून महाराष्ट्रासाठी दिशादर्शक असल्याचे मत ना. मकरंद आबा पाटील यांनी मांडले. याप्रसंगी आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad), आ. मनोज कायंदे (MLA Manoj Kayande) यांच्यासह सार्वजनिक शिवजयंती सोहळ्याचे अध्यक्ष राजेंद्र काळे यांची प्रामुख्याने उपस्थित होती.
छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj) उत्सव समिती बुलढाणा यांच्या शिवसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवार २५ जानेवारी रोजी शिवस्मारक परिसर संगम चौक येथे करण्यात आले, त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.
पालकमंत्री बनल्यानंतर पहिल्यांदाच ना.मकरंद आबा पाटील बुलढाणा शहरात आले होते. यावेळी सायंकाळी त्यांनी (Sampark Office) शिवसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. बुलढाणा शहरातला सार्वजनिक शिवजयंती सोहळा हा भव्य-दिव्य असतो, या सोहळ्याच्या या सोहळ्यात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. शहर व परिसरातील नागरिक बंधू-भगिनीही या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.
त्यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सार्वजनिक जयंती समितीचे संपर्क कार्यालय असावे, या राजेंद्र काळे यांच्या संकल्पनेतून “शिवसंपर्क” कार्यालय Shiv (Chhatrapati Shivaji Maharaj) उघडण्यात आले असून, आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी त्यासाठी शिवस्मारकातील जागा उपलब्ध करून दिली आहे. याच कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्याहस्ते संपन्न झाले. पाहुण्यांचे स्वागत मोहन पऱ्हाड व अरविंद होंडे यांनी केले. सूत्रसंचालन गोपाल सिंग राजपूत यांनी केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष शैलेश खेडकर व त्यांचे पदाधिकारी, शिवप्रेमी व माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.