मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून आ. संजय गायकवाड यांच्या संस्मरणीय कार्यावर गौरवोद्गार !
बुलडाणा (Chhatrapati Shivaji Maharaj) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील शिवस्मारकास विविध 18 पुतळ्यांची महापुरुषांच्या पुतळ्यांचे लोकशाही पद्धतीने राजेशाही थाटात भव्य-दिव्य अनावरण करण्यात आले. जगातील सर्वात उंच 51 फुटांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रूट पुतळ्याचा लोकार्पण सोहळा तर डोळ्याचे पारणे फेडत नेत्रदीपक ठरला. महाराष्ट्रातीलच काय भारतातील सर्वाधिक पुतळ्यांचे गाव हे बुलढाणा असून, या संकल्पनेला आकार देत साकार केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस या सर्व मान्यवरांनी आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्यावर अक्षरशः कौतुकाचा वर्षाव केला.
बुलढाणा नगर परिषदेमार्फत बुलढाणा शहरातील विविध भागात महापूरुषांचे पुतळे स्थापीत करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आज गुरुवार 19 सप्टेंबर रोजी या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते बुलढाणा शहरातील मलकापूर रोडवरील शिवारत्न शिवा काशिद, संत गाडगे बाबा तर जयस्तंभ चौकातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, संगम चौकातील (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रविदास महाराज, शासकीय विश्रामगृह जवळील वसंतराव नाईक, राजर्षी शाहू महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज, तहसील चौकातील नरवीर तानाजी मालुसरे आणि एडेड हायस्कूल चौकातील नरवीर बाजीप्रभू देशपांडे, कारंजा चौकातील अग्रसेन महाराज यांच्या पुतळ्याचे, जैन समाजाच्या स्मारकाचे तसेच भगवान वीर एकलव्य महाराज, महर्षी वाल्मिकी ऋषी, शहिद जवान युध्द स्मारकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री ना. शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, बुलढाणा शहरात उभारण्यात आलेल्या सर्व महापुरुषांचे स्मारके हे आपणां सर्वांना आजही प्रेरणा व उर्जा देणारे ठरतील. या महापुरुषांच्या पुतळे हे भावी पिढीला समतेचा आणि मानवतावादी विचारांचा संदेश देतील. तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी सर्वाधिक महापुरुषांच्या पुतळ्यांचे शहर बुलढाणा बनल्या असून आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी ही संकल्पना साखर केल्याबद्दल त्यांचे कौतुक त्यांची कौतुक केले. (Chhatrapati Shivaji Maharaj) महापुरुषांच्या पुतळ्यांपासून प्रेरणा अन् ऊर्जा मिळते असे त्यांनी सांगून, लोकार्पित झालेल्या या पुतळ्याची देखभाल ही तेवढीच महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचीही आवाहन केले. तर आ. संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेली महापुरुषांची स्मारके ही नतमस्तक होण्याचे ठिकाण बनली असून, ती विचारांची ऊर्जा देणारी ठरावीत, अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी अनावरण कार्यक्रमास केंद्रीय आयुष व आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार सर्वश्री संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad), संजय रायमुलकर, डॉ. राजेंद्र शिंगणे, श्वेताताई महाले, बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.