महापुरुषांच्या स्मारकांचे लोकार्पण उद्या !
बुलढाणा (Chhatrapati Shivaji Maharaj) :
मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे..
तुमच्या यशाचे पोवाडे गातील तोफांचे चौघडे !
ज्यांच्या यशाचे पोवाडे तोफांचे चौघडे गात आहे, असे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), राजमाता जिजाऊ माँ साहेब, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले.. या महामानवांसह तब्बल 18 महापुरुषांच्या स्मारकांचे लोकार्पण गुरुवार 19 सप्टेंबर तर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्यासह, केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव व रक्षाताई खडसे आदी विविध मान्यवरांच्या हस्ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या संकल्पनेतून होत आहे. याच ऐतिहासिक दिनाच्या पूर्वसंध्येला आज बुधवार १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी बुलढाणा शहरातील संगम चौक तसेच जयस्तंभ चौकामध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj) महापुरुषांच्या स्मारकावर भव्य लेझर लाईट व डीजे शोचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी शिवभक्तांनी तसेच नागरिकांनी या ऐतिहासिक नेत्रदीपक सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Buldhana Assembly Constituency) बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे विकासपुरुष धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहरामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) तसेच सर्व महापुरुषांचे स्मारक पूर्णत्वास आलेले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्याहस्ते बुलढाणा शहरातील ५१ फूट उंच शिवस्मारक तसेच इतर २६ महापुरुषांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा १९ सप्टेंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे. तरी लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व नागरिकांनी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, अशी आमदार संजय गायकवाड यांनी विनंती केली आहे.
आपल्या देशाची, राज्याची व आपल्या परीसराची अस्मिता जपतांना माणूस म्हणून माणसांशी आपले नाते दृढ करण्यासाठी महामानवांचे, शूरवीरांचे, संत-महात्म्यांचे विचार, त्यांचे कार्य आणि त्यांचे चरीत्र आपल्याला कायम दिशा देत असतात. म्हणूनच सर्व महापुरुषांचे जीवनकार्य स्मारकाच्या रुपातून जतन व्हावे व पिढ्यानपिढ्यासाठी ही स्मारके प्रेरणेची, उर्जेची व प्रगतीचे केंद्रे ठरावीत या उद्दात हेतूने (Buldhana Assembly Constituency) बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते, विकासपुरुष काळाच्या पुढे जावून विचार करणारे व सर्वधर्मसमभावाची बीजे रोवणारे कल्पक, कृतीशील व अत्यंत लोकप्रिय आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी बुलढाणा शहरात उभारलेल्या अभूतपूर्व, ऐतिहासिक व देशपातळीवर एकमेव ठरणारा व विविध विक्रमांची नोंद करणाऱ्या (Chhatrapati Shivaji Maharaj) महापुरुषांच्या स्मारकांचा व पुतळ्यांचा भव्यदिव्य लोकार्पण सोहळा अनुभवणे म्हणजे नव्या इतिहासाचे साक्षिदार होण्याची सुवर्णसंधीच आहे, तरी या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्याचे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.