परभणी/गंगाखेड (Chhatrapati Shivaji Maharaj) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची महापूजा करून जिजाऊ वंदना घेत सोमवार १७ मार्च रोजी मराठी तिथीप्रमाणे शिवजयंती (Chhatrapati Shivaji Maharaj) साजरी करण्यात आली. यावेळी शिवारायांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
शिवसेनेच्या (उबाठा) वतीने प्रति वर्षाप्रमाणे उपजिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या आयोजनातून सोमवार १७ मार्च रोजी मराठी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी निमंत्रक विष्णू मुरकुटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महारती करण्यात आली. याप्रसंगी नरेंद्र माध्यमिक विद्यालयाच्या चिमुकल्यांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) शिव जन्मोत्सव पाळणा सामूहिक गीत सादर केले तर नादब्रह्म संगीत विद्यालयाचे प्रा.डॉ. सचिन पवार यांनी एकच राजा हा पोवाडा सादर करून उपस्थित शिवप्रेमीनां मंत्रमुग्ध केले.
योग प्रशिक्षक प्रकाश डिकले यांनी जिजाऊ वंदना आणि महाआरती घेतल्यानंतर (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या जय घोषाणे स्मारक परिसर दणाणून गेला होता. यावेळी शिव स्मारक समितीचे समन्वयक गिरीश सोळंके, शिक्षक सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष बाळासाहेब राखे, सुशांत चौधरी, गोविंद यादव, रिपाईचे युवा जिल्हाध्यक्ष धम्मानंद घोबाळे, माजी नगरसेवक तुकाराम तांदळे, रणधीर राजे भालेराव, उत्तम पवार, बाळासाहेब शिंदे, संदीप तापडिया, डॉ. गोविंद मुळे, डॉ. मनोहर ब्याळे, प्राचार्य मुंजाजी चोरघडे, दीपक गोरे, माजी सैनिक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद मुंडे, रामभाऊ मुरकुटे, सुधाकर सोनवणे, अंगद बंगाळ, गजानन कुलकर्णी, माजी सरपंच भगीरथ फड, अमोल दिवान, जगन्नाथ आंधळे, बंडू सौंदडे, विलास विभुते, किरण कौसे, विजय रमतापुरे, रमेश औसेकर, नागेश केरकर, महादेव फड, जितेंश गोरे, विजय भिसे, बालासाहेब पारवे,माऊली लंगोटे आदींसह बहुसंख्य शिव प्रेमी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी विष्णू मुरकुटे, सिद्धेश्वर आंधळे, धोंडीराम जाधव, राजाराम पवार, केशव जाधव, राजेश सगट, नागेश कोणार्डे, वामन पवडे, बंडू पुरी, माजी सैनिक पांडुरंग पाळवदे, ज्ञानेश्वर आंधळे, पिंटू आंधळे, शंभूदेव मुंडे, नरसिंह आंधळे, अक्षय आंधळे, योगेश मुरकुटे, ऋषिकेश सोळंके, बाळू साळवे आदींनी परिश्रम घेतले.