दोषींवर कारवाईची मागणी
निलंगा (Chhatrapati Shivaji Maharaj) : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वाऱ्याने कोसळला, निलंगा येथे संभाजी सेनेच्या वतीने निषेध व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मालवण येथील समुद्र किनारी आठ महिन्यांपूर्वी (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. पुतळा उभारतानाच छत्रपती संभाजी राजे यांनी आक्षेप नोंदवून काम निकृष्ट होत असल्याची तक्रार केली होती. त्याची दखल घेतली नसल्याने पुतळा उद्घाटनानंतर आठ महिन्यांतच वाऱ्याने कोसळून पडला.
सदरील घटनेमुळे तमाम शिवप्रेमी जनतेत संतापाची लाट उसळली आहे तात्काळ (Chhatrapati Shivaji Maharaj) शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करुन निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन त्याला काळ्या यादीत टाकावे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, दर्जेदार पुतळा तात्काळ बसविण्याची कारवाई सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी (Sambhaji Sena) संभाजी सेनेचे जिल्हाध्यक्ष बबन राजे, तालुकाध्यक्ष राजकुमार सोळुके, शहराध्यक्ष प्रदीप कदम, अनिल पौळ, पांडुरंग बेवनाळे, दत्ता जाधव, संजय सोळुके, संतोष घाडगे, व्यंकट इंचुरे, रमेश पाटील, ॲड. किरण घाडगे, हरी जाधव, परमेश्वर मोरे उपस्थित होते.