सकल मराठा समाजाच्या वतीने व महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन
पुसद (Chhatrapati Shivaji Maharaj) : राज्यातील सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची दुर्दशा झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक ब्रांच धातूचा पुतळा कोसळला याप्रकरणी सर्व जबाबदार असणाऱ्या सर्व शासकीय प्रशासकीय व्यक्तींवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून पुन्हा पूर्ववत मजबूत स्मारक निर्माण करण्याचा कालावधी करावा या मागणीसाठी दि. 28 ऑगस्ट रोजी पुसद मध्ये सकल मराठा समाज (Sakal Maratha Samaj) व महाविकास आघाडी कडून दुपारी तीन वाजता दरम्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) चौकात निषेध आंदोलन करून उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनावर एड आशिष देशमुख,शरद मैंद,नितीन पवार, सुशांत महल्ले, हरगोविंद कदम, प्रभाकर टेटर, दीपक महाडिक, संभाजी टेटर, प्रवीण कदम, विलास जाधव,विजय बाबर,चक्रधर मुळे, हरिभाऊ ठाकरे, जिया शेख, पंडितराव देशमुख, धीरज पानपट्टे, दीपक देशमुख, विजय बागल, स्वप्निल जयस्वाल, बाळकृष्ण मगर, दीपक जाधव,गजानन काकडे,प्रभाकर पाटील, एड छाया देशमुख, शुभांगी पानपट्टे, मंदा इंगोले, राजू देशमुख, प्रवेश पांगारकर, प्रशांत गावंडे, सुनंदा वांजाळ, उज्वला खंदारे, वर्षा असोले, उज्वला ठेंगे, सविता देशमुख, राजेश पाटील, अजित लोंढे, दत्ता कदम, संभाजी देशमुख, विवेक शिनगारे, महाविकास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश लीगल सेलचे अध्यक्ष एड आशिष देशमुख, सय्यद इस्तियाक, आदिवासी नेते त्याचा तालुका अध्यक्ष माधवराव वैद्य, शहराध्यक्ष साकिब शहा, साहेबराव ठेंगे, विजय बाबर, नाना जळगावकर, सुरेश धनवे, रवी पांडे, संजय पाटील कान्हेकर, प्रमोद सरगर,धनंजय जैन, शेख बिलाल, दीपक अवचार,नरेंद्र खंदारे, दिनेश गवळी, रवी बहादुरे, जिया शेख यांच्यासह इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.