मराठा सेवा संघ कन्हान व्दारे तारसा रोड चौकात जन्मोत्सव
कन्हान (Chhatrapati Shivaji Maharaj) : राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य मराठा सेवा संघ व छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती कन्हान व्दारे तारसा रोड चौक कन्हान येथे छत्रपती शिवाजी महाराजांची अस्थाई मुर्ती स्थापना, माल्यार्पण आणि पुष्पाचा वर्षाव करून जन्मोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
आज सकाळी ११ वाजता तारसा रोड चौक कन्हान येथे (Chhatrapati Shivaji Maharaj) राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्य मराठा सेवा संघ कन्हान आणि राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मो त्सव समिती कन्हान व्दारे छत्रपती शिवाजी महाराजां ची अस्थाई मुर्ती मसेसं मार्गदर्शक मा ताराचंद निंबाळ कर यांचे अध्यक्षेत स्थापित करून कन्हान पोलीस स्टेशन पीएसआय मा. राजकुमार देशपांडे सर, किराणा दुकानदार असोशियन अध्यक्ष संजय खोब्रागडे यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ आणि महापुरूषांच्या एकत्रित प्रतिमेला पुष्पहार माल्यापर्ण करून ” जय जिजाऊ !! जय शिवराय !!”, ” तुम्हचे आम्हचे नाते काय ? जय जिजाऊ !! जय शिवराय !!” च्या गर्जेने सह (Chhatrapati Shivaji Maharaj) राजे शिवाजी महाराजांच्या मुर्तीस पुष्पाचा वर्षाव करून (Chhatrapati Shivaji Maharaj) राजे शिवाजी महाराज जन्मोत्सवाचा थाटात शुभारंभ करण्यात आला.
हा जन्मोत्सव सोहळा सतत (दि.२०) फेब्रुवारी पर्यंत शिवाजी महाराजांचे पोवाडे, लेझीम, शिवगर्जना ढोल ताशा, आखाडा सह विविध कार्यक्रमा ने मानवंदना सह जन्मोत्सव सोहळा थाटात साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी शांताराम जळते, मोती राम रहाटे, जिवन मुंगले, संदीप कुकडे, दिवाकर इंगोले ,राकेश घोडमारे, राजेंद्र शेंदरे, योगराज अवसरे, अमोल देऊळकर, शिवशंकर वाकुडकर, रोशन गेचुडे, आंनद इंगोले, प्रदीप देशमुख, बाळासाहेब मेश्राम, चंद्रशेखर बावनकु़ळे, विजय खडसे, नामदेव नवघरे, संजय चहां दे, मंगेश काठोके, चेतन जयपुरकर, विठ्ठल मानकर, बाळा नागदेवे, भारत मोकरकर,चेतन वैद्य, प्रविण सोनेकर, जय यादव, अरूण बावनकुळे, सचिन गेचुडे, प्रज्वल मोकरकर, चंदन बागडी, शांतनु वानखेडे सह बहु संख्येने शिवप्रेमीनी उपस्थित राहुन शिवाजी महा राजांना मानवंदना अर्पण करण्यात आली.
राजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्मोत्सवाच्या यशस्विते करिता मराठा सेवा संघ आणि (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती कन्हान पदाधिकारी, सदस्यासह शिवप्रेमी परिश्रम करून सहकार्य करित आहे.