परभणी/सेलू (Chhatrapati Shivaji maharaj) : शहरातील रेल्वे स्टेशनच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या (Shivaji maharaj) छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या फरश्या मागील सहा महिन्यापासून निखळल्या असून याकडे पालिकेसह शहरवासीयांचे दुर्लक्ष होत असल्याने पुतळ्याची शोभाच नाहीशी झालेली आहे. पुतळ्याचे सुशोभीकरण आणि निखळलेल्या परश्या बसविण्यासाठी नगरपालिकेला कधी मुहूर्त लागतो का येते ही शिवप्रेमींनी संताप व्यक्त केल्यानंतर निखळलेल्या परश्या बसण्याचे काम हाती घेण्यात येणार आहेत.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केलेल्या (Shivaji maharaj) छत्रपती शिवरायांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील समुद्रकिनाऱ्यावरील राजकोट येथील भव्य पुतळा सोमवारी कोसळला याचे पडसाद राज्यसह देशात उमटले असून या घटनेचा सर्वत्र शिवप्रेमी कडून संताप व्यक्त करण्यात करत निषेध केला जात आहे. अगदी त्याचप्रमाणे शहरातून रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या आणि याच मार्गाने शहरात येणाऱ्यांना फरश्या निखळलेला हा पुतळा मागील सहा महिन्यापासून असाच पहावा लागत असून पुन्हा किती दिवस पहावा लागेल असा प्रश्न पडला आहे.
पालिका नको तिथे खर्च करून वसुलीचे बिल काढत असताना निदान हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या (Shivaji maharaj) छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या निखळलेल्या फरश्या बसविण्यासाठी मात्र दुर्लक्ष करत आहे. याचाही शिवप्रेमींनी निषेध करून निखळलेल्या फरश्या बसविण्याचे काम तात्काळ हाती घ्यावे म्हणून प्रयत्न झाला पाहिजे.
का नगरपालिका देखील शिवप्रेमींनी निषेध व्यक्त करण्याची वाट पाहत आहे.