परभणी/गंगाखेड(Parbhani):- शहराच्या मध्यवर्ती भागात नगर परिषदेने दिलेल्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे उभारणीसाठी लागणाऱ्या निधी संकलनाला मंगळवार २४ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला असून पुतळा उभारणी कामासाठी सर्वांनी निधी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
गंगाखेड नगर परिषदेने शहराच्या मध्यवर्ती भागात उपलब्ध करून दिलेल्या जागेवर राजा शिवछत्रपती सेवा भावी संस्था व पुतळा समितीच्या वतीने कामाला सुरुवात करण्यात आली असून चबुतरा उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. आगामी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी अश्वारूढ पुतळा उभारून शिवजयंती दिनी अनावरण केले जाणार आहे. यासाठी लागणारा निधी संकलन करण्यासाठी २४ सप्टेंबर मंगळवार रोजी संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य डॉ. आत्माराम टेंगसे, माजी जिप सदस्य भगवान सानप, शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुख विशाल कदम, ॲड. शेख कलीम, उद्धवराव सातपुते, उमाकांत कोल्हे, ॲड. कुलदीप टेंगसे, माधवराव भोसले, माजी नगरसेवक विशाल साळवे, संतोषराव जाधव, जीवन बोडखे, गोपीनाथराव भोसले, दत्तराव ढगे, साहेबराव चौधरी, तुषार गोळेगावकर, दिगंबरराव घोगरे, प्रमोद साळवे, दिगंबरराव निरस, अनिल सातपुते, शेख खदिर, चंद्रकांत कदम, सतीश क्षीरसागर, लखन पुकाने, श्रीकांत भोसले, बंडू सोळंके, उध्दव चोरघडे, धोंडीराम जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून निधी संकलनाला सुरुवात करण्यात आली.
यामध्ये खा. संजय उर्फ बंडू जाधव, संतोष मुरकुटे, माजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, विशाल कदम, ॲड. शेख कलीम आदींसह बहुसंख्य देणगीदारांनी भरभरून निधी देत पुतळा उभारणी कामासाठी सर्वांनी निधी देण्याचे आवाहन केले आहे. प्रस्ताविक ॲड. रावसाहेब वडकीले यांनी तर सूत्र संचालन प्रा. गोविंद चोरघडे यांनी केले. यावेळी गिरीश सोळंके, गोपीनाथ लव्हाळे, उत्तम पवार, भास्कर काळे, रावण भालेराव, संजय तिरवड, क्षितिज चौधरी, गोटू भालके, गंगाधर पवार, अतुल मोरे, किरण कौसे, बंडू सौंदळे, कुलदीप जाधव, शेख उस्मान, विजय रमतापुरे, बालासाहेब शिंदे, गुड्डू कदम, अंबादास इंगळे, सुनील चौधरी, विजय भिसे, योगेश भोसले, संजय बचाटे, यकीन कादरी आदी पुतळा समिती, राजा शिवछत्रपती सेवा भावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य व्यापारी, शिवप्रेमी, शिवभक्त मावळ्यांची उपस्थिती होती.