परभणी/गंगाखेड (Parbhani) :- राजा शिवछत्रपती सेवाभावी संस्था, गंगाखेड नगर परिषद प्रशासन व शिवप्रेमींच्या पुढाकाराने लोकवर्गणीच्या माध्यमातून शहरात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)यांच्या आश्वारूढ पुतळा शिव स्मारक महाशिल्प अनावरणाची तयारी अंतिम टप्प्यात आली असुन पुतळा अनावरणाबरोबर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
रविवार १६ फेब्रुवारी रोजी आश्वारुढ पुतळा महाशिल्पाचे परभणीच्या गंगाखेड शहरात आगमन..!
संत जनाबाई यांच्या जन्माने पावन झालेल्या गंगाखेड शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात असलेल्या नगर परिषदेच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव महाराणा प्रताप चौक परळी नाका या जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारातून शिव छत्रपती सेवाभावी संस्था व नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शिवप्रेमीकडून लोकवर्गणी जमा करत शहराच्या वैभवात भर घालणारा भव्य असा छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा शिवस्मारक महाशिल्प उभारले जात आहे. येत्या रविवार १६ फेब्रुवारी रोजी या भव्य अशा महाशिल्पाचे गंगाखेड शहरात आगमन होणार असुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बुधवार १९ फेब्रुवारी रोजी सकाळी संत जनाबाई मंदिर ते शिवस्मारक दरम्यान पालखी मिरवणूक काढत सायंकाळी ७ वाजता भव्य अतिषबाजी, लेझर शो तसेच डीजेच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळा महाशिल्पाचा नेत्रदीपक अनावरण सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्याप्रसंगी शहर व परिसरातील शिवप्रेमींनी सह कुटुंब, सह परिवार उपस्थित रहावे असे आवाहन नगर परिषद प्रशासनासह राजा शिवछत्रपती सेवाभावी संस्था, शिव जयंती महोत्सव समिती गोदातट, शिव जयंती महोत्सव समिती महाराणा प्रताप चौक, परळी नाका या जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.