अभिषेक वाकोडकर मित्र मंडळाने बसविले 8 फोकस!
परभणी (Chhatrapati Shivaji Maharaj) : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळ्यासह संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळला आहे. भाजपाचे युवा नेतृत्व अभिषेक वाकोडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाकोडकर मित्रमंडळाने (Wakodkar Friends) पुतळ्यासह परिसरात 250 व्हॅटचे 8 फोकस बसविले आहेत. मित्र मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासह परिसराचे सुशोभिकरण!
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यासह परिसराचे सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुध्दा पुतळा व परिसर रात्रीच्या वेळी पूरेशा दिव्यांअभावी अंधारात होता. त्या अनुषंगाने अभिषेक वाकोडकर मित्रमंडळाने महापालिका प्रशासनास (Municipal Administration) निवेदने देवून परिसरात दिवे बसविण्याची (Installation of Lamps) मागणी केली होती. परंतु, प्रशासनाने (Administration) त्याकडे कानाडोळा केला. भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस अभिषेक वाकोडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाकोडकर मित्रमंडळाने सोमवार 26 मे रोजी पुतळा परिसरात 250 व्हॅटचे 8 फोकस बसविले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी छत्रपतींच्या पुतळ्यासह संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळविला.या कार्यक्रमास भाजपा नेते डॉ. केदार खटींग, रितेश जैन, बालाजीराव मोहिते, शंकरराव देशमुख, रामदास पवार, अक्षय डहाळे, मधुसूदन वाकोडकर, अमोल वाकळे, माऊली कोपरे, रोहित उक्कडगावकर, अनिल रेंगे, इशान देशपांडे, योगेश खेत्री, स्वप्नील जोशी, मधुर चक्रवार, मुरली शेळके, अभिषेक वाकोडकर आदी उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रारंभी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी अभिषेक वाकोडकर मित्रमंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.