CM Eknath shinde:- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde)हे आज नांदेड हिंगोली (hingoli)दौऱ्यावर आहेत. सायंकाळी ४ वाजता त्यांचे नांदेड विमानतळावर आगमन झाले यावेळी माजी.खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्याधिकारी मिनल करनवाल, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमानतळावर स्वागत केले.
त्यानंतर पोलिस प्रशासनाच्यावतीने त्यांना विमानतळावर (Airport)मानवंदना देण्यात आली.त्यानंतर ते आपल्या ताफ्यासह नांदेडवरून हिंगोलीकडे रवाना झालेत. हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदरिल कार्यक्रम आटपून ते हिंगोलीवरून पुन्हा नांदेडकडे रवाना होतील नांदेड विमानतळावर ते रात्री मुंबईकडे (Mumbai) प्रयाण करणार आहेत.