कोरची(Gadchiroli) :- बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत राज्यस्तरीय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 अभियानात भगवंतराव हायस्कूल बोटेकसा या शाळेने उल्लेखनिय कामगिरी करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच, आरोग्य(Health), स्वच्छता, पर्यावरण(Environment), क्रिडा इ. घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्याक्तिमत्त्व विकासास चालना देणाऱ्या तसेच शालेय शिक्षणाच्या दृष्टिकोणातून सर्वाधिक महत्वपूर्ण असणाऱ्या शैक्षणिक संपादणूक या घटकाच्या वृद्धीस प्रोत्साहन देणाऱ्या या अभियानात राज्यातील सर्व शाळांचा सक्रिय सहभाग दिसुन आला.
व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन
विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली शाळेने “क्लिनअप ड्राइव्ह, स्वच्छता ड्रिल, शालेय परिसरात सुंदर उद्यान, पर्यावरणपुरक वृक्षांची लागवड व जोपासना, पर्यावरणपुरक वर्गखोल्यांची निर्मिती, कचरा व पावसाचे पाणी व्यवस्थापन व पुनर्वापर, उर्जा संवर्धन, निरोगी व चैतन्यपूर्ण वातावरण, पळसबाग व फळबाग निर्मिती इत्यादी” नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत मुख्याध्यापक मा.एस.एम. पठाण सर्व कर्मचारी व विद्यायांचे अभिनंदन करतांना म्हणाले, ” हा पुरस्कार म्हणजे आमचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या कठोर परिश्रमाचे, सर्जनशिलतेचे आणि समर्पणाचे फळ आहे. ही मान्यता आमच्या विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याची आमची वचनबद्धता दर्शविते. शैक्षणिक उत्कृष्टतेबरोबर निरोगी आणि सुंदर वातावरण तयार करण्यासाठी विद्यार्थी, पालक व गावकरी लोक एकजुटीने काम करतात हे पाहणे प्रेरणादायी आहे.
“संस्थेने शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्याथ्यांबद्दल अभिमान व्यक्त केला. संस्थाप्रमुखांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस.एम. पठाण, नोडल शिक्षक एन.बी. नागपुरे तसेच सहाय्यक शिक्षक एल.आर. जनबंधू, कु.एस.एस. चंदनखेडे, आर. जी. शिवणकर, आर. आर. मस्के, आर.डब्लू. कडते व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी एच. ए. तेलासी, एस. आर. चन्नावार शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.