हैद्राबाद (Revanth Reddy) : तेलंगणा विधानसभेत (Telangana Assembly Elections) ओबीसी आरक्षण 23 टक्क्यांवरून 42 टक्के करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (CM Revanth Reddy) यांनी याची घोषणा केली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घ्यावी आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षण 23 टक्क्यांवरून 42 टक्के करण्याची विनंती करावी, असा प्रस्तावही त्यांनी मांडला.
तेलंगणा विधानसभा निवडणूक 2023 च्या (Telangana Assembly Elections) आधी काँग्रेस पक्षाने (OBC reservation) ओबीसी आरक्षण वाढवण्याचे आश्वासन दिले होते. आता (Telangana Govt) तेलंगणाचे रेवंत रेड्डी सरकार मागासवर्गीय लोकांसाठी शिक्षण, नोकऱ्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 42 टक्के आरक्षणाचा कायदा करणार आहे. (CM Revanth Reddy) मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी विधेयकांना पाठिंबा दिल्याबद्दल सर्व पक्षांच्या सदस्यांचे आभार मानले. सर्व पक्षांच्या नेत्यांनी (PM Narendra Modi) पंतप्रधान मोदींना भेटून 42 टक्के आरक्षणाची मागणी करावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्यांनी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, बंदी संजय कुमार आणि भाजप आमदारांना (PM Narendra Modi) पंतप्रधान मोदींसोबत भेटीची वेळ मिळावी, यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.
Telangana CM Revanth Reddy’s Open Threat To Critics in Assembly: “Will Strip, Beat, Kill – I Have the Law & Power to Do It”
In an unprecedented assault on democracy, Telangana Chief Minister Revanth Reddy openly threatened journalists, YouTubers, and social media critics,… pic.twitter.com/C1ROZ7g2G8
— TeluguScribe Now (@TeluguScribeNow) March 15, 2025
CM रेड्डी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचीही भेट
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (CM Revanth Reddy) म्हणाले की, ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीही भेट घेतील आणि विधेयकांना केंद्राची मान्यता मिळवण्यासाठी संसदेत हा मुद्दा उपस्थित करण्याची विनंती करतील. 50 टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, लोकसंख्येचा कोणताही डेटा उपलब्ध नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांची ठेवली आहे. ते म्हणाले की, (Telangana Govt) तेलंगणा सरकारने देशात पहिल्यांदाच पारदर्शक जात सर्वेक्षण केले आहे, ज्यामध्ये मागासवर्गीय जातींची लोकसंख्या 56.36 टक्के असल्याचे दिसून आले आहे.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची सोशल मीडियावर पोस्ट
सीएम रेवंत रेड्डी (CM Revanth Reddy) यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर पोस्ट केले आणि लिहिले की, काँग्रेस सरकार शिक्षण, रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्वात मागासवर्गीयांसाठी आरक्षण 23 टक्क्यांवरून 42 टक्के करण्यासाठी वचनबद्ध आहे. राज्यात केलेल्या जात सर्वेक्षणाच्या आधारे, मागासवर्गीयांची लोकसंख्या 56.36 टक्के आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या कनिष्ठ वर्गातील लोकांची सर्वात प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.