एकाच घरातील दोन भावांचा समावेश
अमडापूरमध्ये घडला प्रकार
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Accident) : भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मोटार सायकला जोरदार धडक मारली आणि झालेल्या अपघातात पल्सर गाडीवरील तिन युवकांचा मृत्यू झाला. ही (Chikhali Accident) घटना अमडापूर येथे टिपू सुलतान चौकात घडली असून घडलेल्या अपघातात दोन जण एकाच घरातील असून तिसरा त्यांचा मित्र आहे. तिनही मृतक युवक उदयनगरचे रहिवासी आहेत.
उदयनगर येथील राहिवाशी असलेले प्रतिक संजय भुजे (वय 25), त्याचा चुलत भाऊ प्रथमेश राजु भुजे (वय 26) आणि त्यांचा मित्र सौरभ विजय शर्मा (वय 24) हे तिघे उदयनगरला एकाच पल्सरवरून येत होते. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसर (Chikhali Accident) तिघे चिखलीला चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. परत येत असताना अमडापूरच्या टिपू सुलतान चौकात गाडी येताच यांच्या गाडीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक एव्हढी जबर्दस्त होती की पल्सर चकनाचूर झाली. तिघेही फेकले गेले. अपघातानंतर अज्ञात वाहनाने घटनास्थळावरून पोबारा केला.
काहीतरी मोठा आवाज झाल्याने बाजूला एका पंचरच्या दुकानात असलेला तरूण बाहेर येवून त्याने जेव्हा हे दृश्य पाहिले तो हादरला. आणि तातडीने अमडापूर पोलिस आणि अॅम्बुलन्स बोलाविण्यात आली. (Chikhali Accident) तिघांनाही चिखलीला रूग्णालयात आणले परंतु डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केले. ठाणेदार निखील निर्मळ यांनी तिन्ही मृतदेहांचे पोस्टमार्टम करुण अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग घेतला जात आहे. अज्ञात वाहनचालकाविरोधात कलम 106 (1) 281, भारतीय न्याय संहिता सहकलम 134/177 एमव्ही अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही एपीआय निर्मळ यांनी देशोन्नती ला दिली आहे.