देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/ बुलढाणा (Chikhali Agar Section) : माहूर ते जळगाव जाणाऱ्या एसटी बसच्या वाहक चालकाच्या हलगर्जी पणामुळे एक विद्यार्थीला रात्रभर चिखलीमध्ये मुक्काम करावा लागला त्यामुळे मुलीसोबत मोठा अनर्थ घडला असता अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी मुंबई राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. या तक्रारी वरुण तात्काळ (Chikhali Agar Section) चिखली आगार विभागातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. अशा या घटनेमुळे तालुक्यांत मोठी खळबळ उडाली आहे.
सविस्तर असे की सविस्तर असे की मुळावा येथील शिक्षक संभाजी पुंडे यांची कन्या शरयू पुंडे ही बीएएमएस शिक्षण जळगाव येथील आयुर्वेदिक कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहे. ती गावाकडून जळगाव जाण्यासाठी मुळवा वरून पुसद येथे गेली आणि पुसद बस्थानकावर शनिवारी २४ ऑगस्ट रोजी सकाळी माहूर ते जळगाव या गावांच्या नामफलकाची पाटी लागलेली बस क्र एम एच २० बी एल १९३९ उभी होती त्यामुळे विद्यार्थिनीने जळगाव येथे जायचे आहे म्हणुन ती बस मध्ये बसली.
मात्र सदर विद्यार्थीनीला बस कनडाक्टरने जळगाव ऐवजी चिखली पर्यतच टिकिट दिले त्यामुळे विद्यार्थिनीला (Chikhali bus station) चिखली बसस्थानकावरच उतरावे लागले .आणि बस स्थानकावर बराच वेळ थांबूनही जळगाव जाण्यासाठी बस लागली नाही आणि नाईलाजाने रात्रभर चिखलीत मुक्काम करावा लागला या प्रकरणात आगार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळे मुलीसोबत मोठा अनर्थ घडला असता अशी तक्रार मुलीच्या वडिलांनी मुंबई राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली . या तक्रारी वरुण तात्काळ (Chikhali Agar Section) चिखली आगार विभागातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. अशा या घटनेमुळे तालुक्यांत मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत चिखली आगार विभागातील (Chikhali Agar Section) कर्मचाऱ्यांनी सागितले की विद्यार्थीनी (Chikhali bus station) चिखली बसस्थानकावर उतरली होती. परंतु दुपार पासून संध्याकाळ पर्यंत जळगाव जाण्यासाठी चार बसेस चिखली वरुण गेल्या होत्या त्याची निंड सुध्दा रेकॉर्डला आहे परंतु सदर विद्यार्थिनी त्या बसेस मध्ये बसून गेली नाही उलट चुकीची तक्रार दिली . मात्र या तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची सखोल चौकशी केली नाही आणि त्यांच्या तक्रारी वरुण चिखली आगार विभागातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले हे सर्व चुकीचे असून कर्मचाऱ्यावर अन्याय केला असल्याचे दै देशोन्नती शी सांगण्यात आले.