माजी सरपंच संतोष भुतेकर यांचे अनोखे आंदोलन
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Andolan) : खडकपूर्णा प्रकल्पातून अवैध रेतीच्या गाड्यांचे प्रमाण वाढलंच आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रस्ता अतिशय दयनीय झाला आहे दे राजा आणि चिखली महसूलच्या हप्ते खोरीमुळे रेतीचे भाव सुद्धा गगनाला भिडले आहे. या (Chikhali Andolan) सर्व प्रकाराला बुलडाणा जिल्हाधिकारीच जबाबदार असल्याने इसरुळ येथील माजी सरपंच संतोष भुतेकर यांनी (Illegal sand transport) अवैध रेतीचे टिप्पर अडवून टिप्पर समोर जिल्हाधिकारी यांच्या फोटोला जोड्याने मारहाण करून निषेध नोंदविला, असे अनोखे आंदोलन रात्रीला १२ वाजता उघडकीस आले.
चिखली आणि दे राजा महसूल अंतर्गत येणाऱ्या खडकपूर्णा नदी पात्रातून मोठया प्रमाणावर अवैध रेतीची वाहतूक वाळू माफिया कडून केली जात आहे. या रेती माफियावर पोलीस व महसूल यांच्या वतीने सयुक्त कार्यवाही केली जाते मात्र या थातुर मातुर कार्यवाहीला वाळू माफिया थोडेसे ही घाबरत नाही. कार्यवाही असो या लाखोंचा दंड भरून पुन्हा अवैध रेती वाहतूकीसाठी सक्रिय होतात. गेल्या आठ दिवसापूर्वी दोन (Illegal sand transport) वाळू माफियाला एका वर्षासाठी अकोला व येरवडा तुरुंगात टाकले असे असले तरी त्यांचे सहकारी कोणालाही घाबरत नाही उलट जास्त कार्यवाह्या झाल्या की जास्त अवैध रेती वाहतूक केली जाते.
त्यामुळे सामान्य जनतेला अव्वाच्या सव्वा भावाने रेती विकत घ्यावी लागते. यासाठी रेतीची रॉयल्टी उपलब्ध करून द्यावी. रस्त्यांचं मजबुतीकरण व रुंदीकरण करावे, अशा मागणीसाठी अनेक दिवसांपासून लढत आहे परंतु जिल्हाधिकारी किरण पाटील हे झोपेचं सोंग घेत आहेत त्यांच्या दालनात कोनालाही न्याय मिळाला नाही आणि मिळणार नाही त्यांमध्ये चिखलीचे तहसीलदार आणि दे राजाचे तहसिलदार यांना आशीर्वाद मिळत असल्याने दोन्ही तहसिलदारांकडून (Illegal sand transport) अवैध वाळू वाहतूकिकडे हे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे रस्त्यावर अवैध रेतीचे भरलेले टिप्पर अडवून गाडी समोर या अवैध रेती चोरीला जबाबदार असणाऱ्या आणि निष्क्रियतेपणे जबाबदारी सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या फोटोला बुटाणे झोडपून काढत अनोखे आंदोलन केले. या (Chikhali Andolan) अनोख्या आंदोलनांमुळे जिल्हयात मोठी खळबळ उडाली आहे. आता जिल्हा प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.