अंगावरचे दागिने लुटून चोरटे पसार
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Crime) : पती पत्नी शेतातील गोठ्यात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी (Chikhali Crime) संगनमत करून जबरी चोरी करण्याच्या उद्याशाने पती पत्नीस लोखंडी रॉड चा धाक धाकून जबर मारहाण केली आणि अंगावरील दाग दागिणे लुटून पसार झाले ही घटना अंचरवाडी वसंतनगर बंजारा तांड्यावर १६ जुलै रोजीच्या रात्रीला १२ वाजेच्या सूमारास घडली. (Andhera Police) अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंचरवाडी वसंतनगर बंजारा तांड्याच्या शेजारी शेतात राहत असलेले सौ जिजाबाई विष्णू राठोड वय ६० वर्ष व त्यांचे पती विष्णू राठोड हे दोघे पती पत्नी गोठ्यात झोपलेले होते.
रात्री १२ ते १ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने घरात प्रवेश केला आणि पती पत्नीला लोखंडी रॉडचा धाक धाकून त्यांना जबर मारहाण करीत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने ११ ग्रॅम वाजनाचे दागिणे किंमत अंदाजे ७७ हजार रुपये, चांदीचे दागिने व पाटल्या २५ तोळे किंमत १७ हजार ५०० . तसेच एक बैल किंमत २५ हजार रुपये असा एकूण १ लाख १९ हजार ५०० रु चा माल चोरून (Chikhali Crime) घेऊन गेले. अशी तक्रार सौ जिजाबाई विष्णू राठोड वय ६० वर्ष यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला दिली . तक्रार पाहताच तात्काळ ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार यांनी अज्ञात तीन आरोपी विरुध्द कलम ३०९,(६),३ (५) बिएन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्यापही फरार झाले आहेत .या प्रकरणाचा (Andhera Police) पुढील तपास दुय्यम ठाणेदार जारवाल हे करत आहेत.