देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/ बुलढाणा (Chikhali Crime) :- चंदनपुर येथे गेल्या दिड वर्षा पासून दोन भावामध्ये आपसात शेत रस्त्याचा वाद (Chikhali Tehsildar) तहसील कार्यालयात सुरू होता. त्यामध्ये एका भावाच्या बाजूने शेत रस्ता खुला करण्यात यावा असा आदेश पारीत झाला. त्यामुळे विरोधात आदेश पारित केल्याने दुसऱ्या भावाच्या मुलाने नायब तहसीलदार यांना फोन वर शिवीगाळ करून (Chikhali Crime) जीवे मारण्याची धमकी दिली. या वरुण ना तहसिलदार यांनी योगेश इंगळे यांच्या विरुध्द तक्रार देवून गुन्हा दाखल केला आणि आदेशा नुसार (Chikhali Police) पोलीस बंदोबस्तात शेत रस्ता खुला करून दिला.
पोलीस बंदोबस्तात शेत रस्ता केला मोकळा
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंदनपुर येथील राजू इंगळे आणि विष्णू इंगळे या दोघा भावाची जमीन गावाला लागून गट नंबर ७० मध्ये आहे. परंतु या भावांमध्ये शेत रस्त्याच्या वादावरून तहसील कोर्टात प्रकरण सुरू होते. तहसिलदार संतोष काकडे यांनी दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आणि दोघा भावाचा शुल्लक कारणावरून वाद मिटवून राजू इंगळे यांच्या बाजूने आदेश पारित करूण विष्णु इंगळे यांनी अडविलेला शेत रस्ता खुला करून देण्यात यावा असा आदेश केला. या आदेशा नुसार (Chikhali Tehsildar) ना तहसिलदार संतोष मुंढे यांनी पंचासमक्ष घटनास्थळी जावून शेत रस्त्याची पाहणी केली शेत रस्ता खुला करण्यास सागितले. मात्र शेत मालक यांनी वाद घालून रस्ता खुला केला नाही. उलट १९ जून रोजी रात्रीला ना तहसिलदार संतोष मुंढे यांना फोन वर शिवीगाळ करीत शेत रस्ता कसा खुला करूण देता, तुम्ही घरा बाहेर या तुम्हाला दाखवून देतो असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून तहसिलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ना तहसिलदार (Chikhali Tehsildar) यांनी शेत मालक योगेश इंगळे यांच्या विरुध्द ५०७ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल केला. आता या (Chikhali Crime) प्रकरणाला वेगळे वळण लागू शकते म्हणून वाद होवू नये यासाठी तहसिलदार यांनी ना तहसिलदार वीर यांना या प्रकरणात लक्ष घालून निपटारा करण्याचे सागितले. त्यामुळे ना तहसिलदार वीर यांनी मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच महसूलचे कर्मचारी, पत्रकार यांना सोबत घेवून २० जून रोजी दुपारी १ वाजता पोलीस बंदोबस्तात शेत रस्ता खुला करून दिला .
यावेळी घटनास्थळी (Chikhali Tehsildar) तहसिलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ना तहसिलदार ना वीर, ना तहसिलदार संतोष काकडे, मंडळ अधिकारी पवार, मंडळ अधिकारी जाधव , तहसिलदार रक्षक जोरवार, तलाठी भुसारी, तलाठी खेडेकर, तलाठी गावंडे, तलाठी गिरी, तलाठी सोनुने, चालक भोफळे, सरपंच इंगळे, तथा शेतकरी बांधव, आणि अंढेरा पोलीस स्टेशनचे बिट जमादार देढे , पोहेकॉ कायंदे, पो हे कॉ गवई मॅडम, पत्रकार प्रताप मोरे, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.