माजी सरपंच संतोष भुतेकर यांचेवर गुन्हे दाखल
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/ बुलडाणा (Chikhali Crime) : दे राजा आणि चिखली महसूलच्या हप्ते खोरीमुळे खडकपूर्णा नदी पात्रातून मोठया प्रमाणावर (Illegal sand transport) अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे. या सर्व प्रकाराला बुलडाणा जिल्हाधिकारीच जबाबदार असल्याने इसरुळ येथील माजी सरपंच संतोष भुतेकर यांनी अवैध रेतीचे टिप्पर अडवून जिल्हाधिकारी यांच्या फोटोला जोड्याने मारहाण करून निषेध नोंदवून व्हिडिओ व्हायरल केला. हा प्रकार चांगलाच अंगलट आल्याने (Chikhli Tehsildar) चिखली तहसिलदार संतोष काकडे (Santosh Kakade) यांनी माजी सरपंच संतोष भुतेकर यांच्यावर १४ जुलै रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल (Chikhali Crime) केले आहे.
चिखली आणि दे राजा महसूल अंतर्गत येणाऱ्या खडकपूर्णा नदी पात्रातून मोठया प्रमाणावर (Illegal sand transport) अवैध रेतीची वाहतूक वाळू माफिया कडून केली जात आहे. या रेती माफियावर पोलीस व महसूल यांच्या वतीने सयुक्त कार्यवाही केली जाते. मात्र या थातुर मातुर कार्यवाहीला वाळू माफिया थोडेसे ही घाबरत नाही. कार्यवाही असो या लाखोंचा दंड हे भरून पुन्हा अवैध रेती वाहतूकीसाठी सक्रिय होतात. गेल्या आठ दिवसापूर्वी दोन वाळू माफियाला एका वर्षासाठी अकोला व येरवडा तुरुंगात टाकले असे असले तरी त्यांचे सहकारी कोणालाही घाबरत नाही उलट जास्त कार्यवाह्या झाल्या की, जास्त अवैध रेती वाहतूक (Illegal sand transport) केली जाते त्यामुळे सामान्य जनतेला अव्वाच्या सव्वा भावाने रेती विकत घ्यावी लागते.
परंतु जिल्हाधिकारी किरण पाटील हे झोपेचं सोंग घेत आहेत त्यांच्या दालनात कोनालाही न्याय मिळाला नाही आणि मिळणार नाही, असा आरोप करत चिखलीचे तहसीलदार आणि दे राजाचे तहसिलदार (Chikhli Tehsildar) यांच्या आरोप प्रत्याआरोप करीत या (Illegal sand transport) अवैध रेती चोरीला जबाबदार असणाऱ्या आणि निष्क्रियतेपणे जबाबदारी सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या फोटोला बुटाणे झोडपून काढत अनोखे आंदोलन केले. व्हिडिओ सर्वत्र वायरल केला, त्यामुळे जिल्हयात मोठी खळबळ उडाली होती. आता जिल्हा प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. व्हिडिओ वायरल होताच (Chikhli Tehsildar) चिखली तहसिलदार संतोष काकडे (Santosh Kakade) यांनी अंढेरा पोलीस स्टेशन गाठले आणि जिल्हाधिकारी किरण पाटील, चिखली , दे राजा तहसिलदार यांची बदनामी केल्या प्रकरणी माजी सरपंच संतोष भुतेकर यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे (Chikhali Crime) दाखल केले आहेत. आता या प्रकरणात आनखी काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.