मेरा बु व गुंजाळा गावावर पसरली शोककळा
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Death Cases) : सततची नापिकी व कर्जबाजारी पणाला कंटाळून एका २८ वर्षीय शेतकरी पुत्राने राहत्या घरामध्ये गळफास घेवून (Chikhali Death Cases) आत्महत्या केली. ही घटना मेरा बु. येथे ११ ऑगस्ट रात्री घडली. तर गुंजाळा येथील अर्जुन घुगे यांचा मोठा मुलगा धंनजय घुगे याचा तापाच्या आजाराने मृत्यु झाला. या दोन्ही घटनेमुळे गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.
चिखली तालुक्यातील अंढेरा पोलीस स्टेशन (Andhera Police) अंतर्गत येणाऱ्या मेरा बु. येथील रहिवाशी असलेले अल्पभूधारक शेतकरी उद्धव किसन चेके यांच्याकडे भाग २ मध्ये ३ एकर कोरडवाहू जमीन आहे. या शेतीवर त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मेरा खुर्द कडून १ लाख ५० हजार रुपयाचे पीककर्ज घेतले होते . मात्र सततची नापीकी आणि यावर्षीची पिकाची अंत्यत वाईट परिस्थिती पाहून वडली बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करतील तसेच घरकर्ज कसे चालवतील अशी चिंता गजानन चेके याला भासू लागली या नैराश्यापोटी गजानन यांनी मध्यरात्रीला राहत्या घरामध्ये गळफास घेवून जीवनयात्रा संपवली.
या (Chikhali Death Cases) घटनेची माहिती पोलीस पाटील बद्रिप्रसाद पडघान व तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी (Andhera Police) अंढेरा पोलीस स्टेशनला दिली . या माहिती वरुण बिट जमादार देढे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचासमक्ष पंचनामा केला. अशा तरूण मुलाने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली असून, या कुंटूबाला शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा गावकरी करत आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ एक बहीण असा आप्त परिवार आहे.
तसेच गुंजाळा येथील अर्जुन घुगे यांचा मोठा मुलगा धंनजय घुगे वय ४२ वर्ष याला जास्त प्रमाणात ताप आल्याने त्याला चिखली येथील दळवी यांच्या रुग्णालयात भरती केले होते. परंतु घरी आल्यावर अचानक स्वास घेता येत नव्हता म्हणून नातेवाईकांनी त्याला (Aurangabad Hospital) औंरगाबाद येथे जावून एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केला परंतु डॉक्टरांनी सतत चार ते पाच दिवस उपचार करूनही यश आले नाही आणि उपचार दरम्यान धंनजय घुगे यांनी प्राणज्योत मावळली. अशा या (Chikhali Death) दोन्ही घटनेमुळे दोन्ही गावात मोठी शोककळा पसरली आहे.