औषध निरक्षकाकडे तक्रार
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Doctor) : येथील डॉक्टर पोहरकर (Doctor Poharkar) यांचे विद्या मेडिकलमध्ये (Vidya Medical) राजरोसपणे दररोज कालबाह्य औषधाची विक्री होत असल्याची तक्रार वैभव शेळके यांनी औषध निरक्षकाकडे तक्रार केली आहे . तक्रारी मध्ये नमूद केले आहे की बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरामध्ये पोहरकर डॉक्टर यांचे श्री विद्या मेडिकल मध्ये गेल्या तीन महिन्या अगोदरची मुदत संपलेली औषधी ही रुग्णांना दिली जाते आणि या मेडिकल मध्ये बरीचशी औषधीची तपासणी केली असता मुदत संपलेली औषधी आढळून आली. याची माहिती डॉ. पोहरकर (Doctor Poharkar) यांना विचारली असता त्यांनी सांगितले नजर चुकीने झाले असेल असे सांगण्यात आले.
डॉक्टरांच्या (Doctor Poharkar) सांगण्यावरून असे लक्षात येते की, रुग्णाच्या आरोग्याचे व जिवाचे त्यांना काहीच घेणे देणे नाही. यांना फक्त मुदत संपलेल्या औषधांची विक्री करायची आहे. असे दिसून येते. याउलट पत्रकार बांधव यांनी औषध निरीक्षक जी. पी. घिरके यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले आम्ही पूर्ण औषधी चेक करू शकत नाही. मेडिकल लायसन्स धारकांना फक्त विचारणा करतो. असे त्यांनी सांगितले.
वैभव शेळके (पेशंट) हे डॉक्टर यांच्याकडे तपासणीसाठी गेले असता त्यांनी तपासणी केली. आणि त्यांना औषधी (Drug Controller) लिहून दिली आणि श्री विद्या मेडिकल (Vidya Medical) मधून औषधी घेण्यास सांगितले. वैभव शेळके औषधी घेऊन त्यांना दाखवण्यासाठी गेले असता त्यांनी औषधीची तपासणी न करता आद्रट डॉक्टर बोलले की हॉस्पिटलच्या फाईलवर लिहिल्याप्रमाणे औषधी घ्या. दोन क्रीम मिक्स करून लावा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे औषधी रात्री घेतल्यावर दुसऱ्या दिवशी रुग्णाला खूप त्रास सुरु झाला . रुग्णाने जेव्हा औषधीची खात्री केली. तेव्हा दिसून आले की औषधांची मुदत तीन महिने अगोदरच संपलेली होती. आशा गैर हलगर्जी पणामुळे रुग्णाचा जीव ही जाऊ शकतो. याला जबाबदार कोण?
असे रुग्णांच्या जीवाशी डॉक्टर आणि मेडिकलवाले खेळत आहे.आणि या एकाच मेडिकल वरून कमीतकमी चार,पाच डॉक्टर औषधी घेण्यास सांगतात यांचं काय चालय हे कोणाला औषध निरीक्षकाला माहिती नाहीं का? का यांना कुणाची भीती नाहीं? अशी चूक परत कोणत्याच (Drug Controller) मेडिकलवर होता कामा नये.या गोष्टीकडे शासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे. औषध निरक्षक यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी सांगितले संबंधित सर्वांवर कारवाई करू परंतु कारवाई कशी करतात याकडे (Chikhali Doctor) चिखली वासियांचे लक्ष आहे. संबंधितावर कडक कारवाई झाली पाहिजे. असा सूर जनतेतून उमटत आहे.