महसूल व पोलिसांनी घेतला निर्णय
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Drone camera) :- गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हाभर चर्चेत असलेल्या खडकपूर्णा नदी पात्रातून अवैध रित्या वाळू माफिया हे चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करतात. यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने अनेक कर्यवाह्या केल्या तरी सुध्दा वाळू माफियावर कोणताही फरक पडला नाही उलट जेवढ्या कार्यवाहया तेवढ्या प्रमाणात रेतीची चोरी केली जात असे. त्यामुळे अखेर महसूल व पोलीस प्रशासनाने एक मोठा निर्णय घेत खडकपूर्णा नदी पात्रातील अवैध रेती चोरीवर (Drone camera) ड्रोन कॅमेऱ्याची नजर ठेवली आहे.
चिखली व देऊळगाव राजा तालुक्यांतील शेवटचा टोकावर असलेल्या (Andhera Police) अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत जिल्ह्यात नावाजलेले एक मोठे खडकपूर्णा प्रकल्पाचे वाळू उपसा नदी पात्र आहे . या नदी पात्रातून जिल्हाभर वाळू माफिया हे चोरट्या मार्गाने रेतीचा उपसा करून टिप्परने वाहतूक करत गावा गावात विक्री करतात. या अवैध रेतीची वाहतूक चोरट्या मार्गाने वाळू माफिया कडून होवू नये, म्हणून दे राजा आणि चिखली महसूल विभागाने वाळू उपसा नदी पात्र असलेले दगडवाडी, मेहुनाराजा, बायगाव, चिंचखेड व सुलतानपूर , नारायण खेड , दिग्रस, शेळगाव आटोळ, आदी गावाच्या नदी पात्रावर मंडळ अधिकारी, तलाठी , कोतवाल आदी कर्मचारीचे पथक नेमणूक करूण रात्रभर रोडवर अथवा नदी पात्राच्या घटनास्थळी गस्त देत होते.
परंतु वाळू माफिया हे या पथकाच्या कर्मचाऱ्यांसोबत हातमिळवणी करून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक करत असत. त्यामुळे अनेक वेळा महसूल व पोलीस प्रशासनाने वाळू माफिया वर कार्यवह्या करून गंभीर स्वरुपाचे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करत होते. त्यांमध्ये अनेकवेळा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर वाळू माफिया कडून जीवघेणे हलले करण्यात आले . त्यातच टिप्पर चालक कोणाचीही पर्वा न करता भरधाव वेगाने वाहणे चालवित असल्याने अनेक अपघात होवून नागरिकांना आपला जीव गमावावा लागला . त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांनी खडकपूर्णा नदी पात्रावरील अवैध रेती उपसा करण्याऱ्या वाळू माफियावर नजर ठेवण्यासाठी (Drone camera) ड्रोन कॅमेऱ्याची नजर ठेवली आहे त्यामुळे आता वाळू माफियाची चांगलीच पंचाईत उडाली आहे.