देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali farmer) : जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडुन उघडुन गेला. त्यामध्ये काही (Chikhali farmer) शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला सुरवात केली तर काही शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली होती. त्यामुळे आठ दिवस अगोदर झालेल्या पेरण्या मुळे पिकाची उगवण चांगली झाली असल्याने, काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकामध्ये कोळपणीला सुरवात केली आहे. तर काही शेतात उशिरा पेरण्या झाल्याने नुकतेच बियाणे जमिनीतून उगवत आहे.
बैलजोडी मालकाला आले महत्व
चिखली तालुक्यातील मेरा बु , मनूबाई, गुंजाळा , मेरा खुर्द, अंत्री खेडेकर आदी गावातील शेत जमीन कोरडवाहू असून डोंगराळ स्वरूपाची आहे. त्यामुळे या परिसरातील (Chikhali farmer) शेतकरी दरवर्षी जून महिन्याच्या खरीप हंगामात पहिल्याच आठवड्यात धूळ पेरणीला सुरवात करतात यावर्षी तर मृग नक्षत्र लागताच जोरदार पाऊस पडला आणि धावपळ करीत शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला सुरवात केली.
परंतु दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने अचानक दांडी मारली आणि सतत आठ दिवस पावसाने पाठ फिरवली त्यामुळे सुर असलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी थांबविल्या काझी शेतात सोयाबिन उगवण्यास सुरवात झाली. तर काही शेतातील पेरलेली सोयाबीन उगलीच नाही त्यामुळे काही (Chikhali farmer) शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट पसरले. मात्र आठ दिवसानंतर पुन्हा पाऊस पडला आणि थांबलेल्या पेरण्या सुरू होवुन तीन दिवसात पूर्ण आटोपल्या. त्यामध्ये सुरवातीला मलगी शेत शिवारात झालेल्या पेरण्यामुळे शेतकरी श्रीकांत राऊत यांनी सोयाबिन पिकामध्ये कोळपणी सुरू केली. काही शिवारात तर नुकतेच जमिनीतून सोयाबीन बियाणे उगवत आहेत. त्यामुळे एकीकडे सोयाबीन पिकामध्ये कोळपणी तर दुसरीकडे केव्हा जमिनीतून बियाणे उगवणार याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.