देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Fire) : बसस्टॉप वरुण भरधाव वेगात जाणाऱ्या अवैध रेतीच्या टिप्परला दगड मारून वाहनाचे नुकसान करत (Chikhali Fire) पेटून दिले . त्यामुळे संपूर्ण वाहनाचा कोळसा झाला अशा तक्रारीवरुन (Andhera Police) अंढेरा पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मध्यरात्री इसरुळ येथे घडली.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दे घूबे येथील पंजाब दिनकर घुबे वय ४३ वर्ष यांनी दिलेल्या तक्रारी मध्ये नमूद केले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास इसरुळ रोड गावातील संतोष भुतेकर, दीपक पुंगळे, लाला पूर्ण नाव माहित नाही यांनी माझे मालकीचे टिप्पर क्रमांक एम एच २८ बी वाय ४९४८ वर दगडफेक करून पेटवून (Chikhali Fire) नुकसान केले. तसेच मला रोडने टिप्पर चालवायचे असेल तर महिन्याला ५० हजार रुपये द्यावे लागतील अशी खंडणी स्वरूपात पैशाची मागणी केली. अशा तक्रारीवरुन (Andhera Police) ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार देडे यांनी आरोपी माजी सरपंच पती संतोष भुतेकर ,दीपक पुंगळे ,लाल्या सर्व राहणार इसरूळ यांच्या विरुध्द भारतीय न्याय संहिता (BNS) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.