गावकऱ्यांनी माजी मंत्री डॉ शिंगणे पुढे माडले गऱ्हाने
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Health centre) : जिल्हा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे चिखली तालुक्यातील मेरा बु येथील आरोग्य उपकेंद्रावर गेल्या पाच वर्षांपासून डॉक्टर नाही आणि आता पशु वैद्यकीय दवाखानाही डॉक्टर अभावी शोभेची वास्तू बनली आहे . त्यामुळे पशु पालकासह, रुग्णांना खाजगी डॉक्टरांचा फार मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो असे गऱ्हाने गावकऱ्यांनी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचाकडे मांडले.
चिखली तालुक्यातील १५ हजार लोकसंख्या असलेल्या मेरा बु गावामध्ये शासनाने रुग्णांच्या सेवेसाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच आजारी जनावरांच्या उपचारासाठी पशू वैद्यकिय दवाखान्याची व्यवस्था केली आहे . मात्र जिल्हा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे आरोग्य उपकेंद्र हे गेल्या पाच वर्षांपासून डॉक्टर अभावी रामभरोसे सुरू आहे . त्याच बरोबर आता पशु वैद्यकीय दवाखानाही डॉक्टर अभावी शोभेची वास्तू बनली आहे.
अशा या प्रकारामुळे गावात खाजगी डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला असल्याने गावकऱ्यांना आथिर्क भुर्दंड सोसावा लागत आहे. गावकऱ्यांनी अनेकवेळा कायमस्वरूपी डॉक्टर मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली परंतु अद्याप पर्यत डॉक्टर देण्यात आला नाही . मात्र १० ऑक्टोबर रोजी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आणि परिसरातील विविध पिकाचे अतोनात नुकसान होवून गेले . या घटनेची बातमी दै देशोन्नती न्युज पोर्टलवर प्रकाशित करण्यात आली . या बातमीची दखल घेत माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे हे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी मेरा बु येथे आले . आणि शेतात जावून पिकाची पाहणी केली असता झालेले नुकसान पाहता लगेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ, विजू पाटील, दत्तू पाटील राजेंद्र पाटील, भास्कर पाटील , सत्तार पटेल, दिनकर पडघान, सरपंच उपसरपंच तथा सदस्यानी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडे गऱ्हाने मांडले की गावात अनेक पशु पालकांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला असल्याने अनेकाकडे महागड्या गाई, म्हशी आहेत.
परंतु ही महागडी जनावरे आजारी पडल्यास त्यांच्या उपचारासाठी गावात डॉक्टर नसल्याने खाजगी डॉक्टरांचा आथिर्क भुर्दंड सोसावा लागतो त्यामुळे गावकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक आरोग्य उपकेंद्र आणि पशु वैद्यकीय दवाखान्यावर कायमस्वरूपी डॉक्टर द्यावा जेणे करून लोकांना आथिर्क भुर्दंड सोसावा लागणार नाही . अशी मागणी केल्याने डॉ राजेंद्र शिंगणे यांनी विजू पाटील यांच्या शेतात जावून गाई म्हशी यांची पाहणी करूण लगेच वरिष्ठांना फोन लावून सांगीतले की लवकरात लवकर मेरा बु येथील पशु वैद्यकीय दवाखाना तसेच आरोग्य उपकेंद्र यावर कायमस्वरुपी डॉक्टरांची व्यवस्था करा. जर यापुढे गावकऱ्यांची तक्रार आल्यास याला आपले अधिकारी जबाबदार राहतील अशा कडक सूचना करण्यात आल्या .त्यामुळे आता मेरा बु वासियांचा समस्यांचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार असल्याचे दिसुन येत आहे.