खून की आत्महत्या, चौकशी अंती उघड होणार
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Murder case) : गेल्या चार दिवसापासून बेपत्ता इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत चिचखेड शिवारातील एका शेतकऱ्यांच्या शेतातील मकाच्या पिका मध्ये आढळून आले. परंतु हा खून (Murder case) की आत्महत्या आहे हे पोलिसांच्या तपासात निष्पन्न होणार असल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना १९ सप्टेंबर रोजी चिच खेड येथे घडली.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चिंचखेड येथील पोलीस पाटील दिलीप श्रीराम वायाळ यांनी पोलिसांना माहिती दिली की गावातील तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप भीमराव वायाळ यांनी फोन करून सांगितले की चिंचवड शिवारातील किशोर भास्कर वायाळ यांचे गावालगत असलेल्या शेत गट नंबर २२४ मधील शेतातील विहिरीजवळ मका च्या शेतात एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत (Murder case) दिसून आले आहे . त्यामुळे लगेच त्यांनी अंढेरा पोस्टेला माहिती दिली.
ठाणेदार विकास पाटील यांना माहिती मिळताच तात्काळ घटणास्थळी पोलिसांनी धाव घेवून घटनास्थळ पाहिले असता सदर प्रेत हे कुजलेल्या अवस्थेत आढळले. मात्र हे प्रेत कोणाचे आहे हे समजायला बराच वेळ लागला अखेर गावातील एक इसम बेपत्ता आहे हे समजताच त्यांच्या पत्नी व मुलांना घेवून प्रेताची पाहणी केली असता हे कुजलेले प्रेत विजय रामा जाधव वय ३५ वर्ष राहणार चिंचखेड यांचे असल्याचे नातेवाईकांनी ओळखले. परंतु ही आत्महत्या आहे की, (Murder case) खून आहे. हे पोलीस तपासात निष्पन्न होईल पण तोपर्यंत ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कैलास उगले यांनी मर्ग दाखल केला आहे.