चौकशी करीता ताब्यात घेतलेल्या संशयितातीलच तिघांनी दिली कबुली
चिखली (Chikhali Murder) : येथील जितेश पगडवार या २८ वर्षीय यूवकाचा मृतदेह शूक्रवार रोजी पहाटे चिखली -वडेगाव मार्गावर आढळून आल्याने खळबळ माजली होती सदर प्रकरणात गावातीलच काही युवकांना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते, त्यातील तीन यूवकानी मोबाइल चा शूल्लक वादावरून हत्येची (Chikhali Murder) कबूली दिली आहे. अशी माहिती आज दि.१० आगस्ट शनिवार रोजी (Kurkheda Police) कूरखेडा पोलीस स्टेशन चा वतीने देण्यात आली आहे.
आरोपी जितू उर्फ विशाल पिसोरे (१९) वैभव सहारे (१९) व अमन पठान (२०) सर्व रा.चिखली याना अटक करण्यात आली आहे तिन्ही हत्येचे आरोपी मित्र आहेत. आरोपी जितू याचा मोबाइल काही दिवसापूर्वी हरवला होता व हा मोबाइल मृतक जितेश यानेच पळविला असेल, अशी आरोपीना शंका होती. यावरून मागील काही दिवसापासून त्यांचात वाद होत होता हा वाद विकोपाला गेल्याने गूरूवार रोजी वडेगाव रस्त्यावर रात्री १०.३० ते ११ च्या दरम्यान लोखंडी सळाखीने डोक्यावर वार करीत त्याची हत्या करण्यात आल्याची कबूली आरोपींनी दिली आहे.
पोलीसानी (Chikhali Police) प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेत काल शूक्रवार रोजी सकाळीच शंकेवरून आरोपीना ताब्यात घेत चौकशी सूरू केली होती. पोलीसी खाक्या दाखवताच आरोपीनी गून्हाची कबूली दिल्याने त्यांचा विरोधात भारतिय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१),३(५) अन्वये गून्हा दाखल करीत अटक करण्यात आली.न्यायलयाने आरोपीना ४ दिवसाची पोलीस कोठडी सूनावली आहे. घटनेचा पूढील तपास ठाणेदार महेन्द्र वाघ यांचा मार्गदर्शनात करण्यात येत आहे.