१७ व्या प्रभारी बिडीओपदी सुरडकर
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Panchayat Samiti) : जिल्हा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे गेल्या सहा वर्षांपासून (Chikhali Panchayat Samiti) चिखली पंचायत समितीला प्रभारी बिडीओ पदाचे ग्रहण लागले असल्याने आज १७ व्यांनदा प्रभारी बिडीओ म्हणून एल पी सुरडकर यांनी पदभार स्वीकारला आहे जिल्हयात ( अ ) दर्जा प्राप्त असलेली चिखली पंचायत समिती आहे. या पंचायत समितीला सहा वर्षांपासून एका पाठोपाठ १७ प्रभारी बिडीओनी पदभार सांभाळला आहे. त्यामुळे या पंचायत समिती अंतर्गत विकास कामे, शासकीय कामे कासवगतीने सुरू आहेत .
नुकतेच प्रभारी बिडीओ म्हणून एल पी सुरडकर यांनी पदभार स्वीकारला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली डेंग्यू व साथरोग संदर्भात सभा घेण्यात आली. (Chikhali Panchayat Samiti) सभेमध्ये मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील वैद्यकिय अधिकारी, उपकेंद्र स्तरावरील समुदाय वैद्यकिय अधिकारी (CHO), ४ आरोग्य साहाय्यक यांची सभा घेवून सर्वाँना कळविले की डेंग्यू व साथरोग रुग्णामध्ये वाढ आढळून आल्यास तात्काळ स्थानिक ग्रामग्रामसेवक यांना सुचना दयाव्यात, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्तरावर पुरेशा प्रमाणात औषधीसाठा, उपलब्ध ठेवावा , आरोग्य सेवक व सेविका योनी नियमित गृहभेटी दयाव्यात. वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयी हजर राहावे, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. विशाल रिंगे, विस्तार अधिकारी विलास अंभोरे, सुनिल जुमडे, आरोग्य साहाय्यक, सेविका , तथा आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.