वाळू माफियांचे ढाबे दणाणले
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Sand Mafia) : खडकपूर्णा प्रकल्पाच्या नदी पात्रातून वाळू माफिया (Sand Mafia) हे बोटीच्या साह्याने अवैध रेती उपसा करून चोरट्या मार्गाने रेतीची विक्री करत होते हा प्रकार तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी युवा सेना उप-जिल्हाप्रमुख (शिंदे गट) संतोष भुतेकर यांनी २८ ऑगस्ट पासून आमरण उपोषणाची बातमी दै देशोन्नती पोर्टल वर प्रकाशित करण्यात आली होती बातमी प्रकाशित होताच सर्वत्र खळबळ उडाली आणि तात्काळ सि. राजा येथील एचडीपिओ प्रा . संजय खडसे यांनी उपोषण मंडपाला भेट देवून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे (Hunger strike) उपोषण कर्त्यानी उपोषण मागे घेतले.
अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खडकपूर्णा प्रकल्पाचे नदी पात्र हे पोलीस स्टेशन हद्दीत येत असून अवैध रेतीची वाहतूक इसरुळ गावातून होत होती. मात्र (Sand Mafia) वाळू माफिया हे मोठया प्रमाणावर शासनाचा महसूल न भरता रेतीची विक्री जिल्हा भर गावो गावी करत असत .परंतु जनतेला बांधकामे करण्यासाठीं स्वस्त दरात रेती मिळत नव्हती त्यामुळे हा प्रकार बंद करण्यासाठी इसरुळ येथे शिंदे गटाचे युवा सेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर, मंडपगावचे सरपंच सचिन कदम यांनी दोन दिवसा पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. या (Hunger strike) उपोषणाची बातमी दै देशोन्नती पोर्टल वर प्रकाशित करण्यात आली बातमी प्रकाशित होताच तात्काळ सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी संजय खडसे देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ चिखलीचे नायब तहसीलदार वीर अंढेरा पोलीस स्टेशन ठाणेदार विकास पाटील, मंडळ अधिकारी सोनुने यांनी संयुक्तरीत्या उपोषणाला भेट देवुन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या. आणि म्हंटले की आपलं प्रशासन कुठेतरी चुकतंय हे मोठ्या मनाने मान्य करून आपण यानंतर आज पासूनच नियोजनबद्ध कारवाई करू. आज पासून २४ तासासाठी ,दोन शिफ्ट मध्ये पथक रोडवर ठेवू.
पथक फक्त महसूल कर्मचारी न ठेवता त्यासोबतच पोलीस कर्मचारी सुद्धा ठेवणार. शिवाय एवढेच नाही तर आठ दिवसांमध्ये आम्ही खडक पूर्ण प्रकल्पामध्ये सुरू असलेल्या बोटी नष्ट करण्याच्या कारवाईला सुरुवात करू. कुठल्याही परिस्थितीमध्ये धरणातले एकुण-एक बोट बाहेर काढण्याचा आमचा प्रयत्न राहील. परंतु बोटी नष्ट करण्यासाठी आम्हाला वेळ द्यावाच लागेल. खडकपूर्णा प्रकल्पाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे असे खडक पूर्णा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना सुद्धा आम्ही पत्र व्यवहार करून बोटीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू. खडक पूर्ण प्रकल्पात बोटी चालवणारे जे कामगार आहेत. ते परदेशी असल्याचे भुतेकर यांनी सांगितल्यानंतर सदर कामगार हे परदेशी असून त्यांचे कुठलेही नोटिफिकेशन पोलीस स्टेशनला नाही, नोंदणी नाही.
परिसरात कुठेही एखादा दरोडा झाला किंवा खडकपूर्णा प्रकल्पाची भिंतच या परदेशी लोकांच्या माध्यमातून फोडल्या गेली तर, प्रशासन काय करेल असा प्रश्न भुतेकर यांनी उपस्थित केल्यानंतर त्यांचाही तात्काळ बंदोबस्त करण्याचे आश्वासन ठाणेदार यांनी दिले.उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी तक्रारीनुसार दोन्ही तहसीलदारांना आदेशित केले की भुतेकर आणि सचिन कदम यांचे फोन रिसीव करून त्यांना वारंवार आपण सहकार्य केलं पाहिजे. शिवाय पथकामध्ये होत असलेल्या गैरव्यवहाराबद्दल सुद्धा सूचना केली पाहिजे तसेच यानंतर पथक कोणाकडूनही पैसे घेणार नाही. आणि वेळेच्या आधी निघून जाणार नाही. असेही स्पष्टपणे अधिकाऱ्याने सांगितले. असे लेखी आश्वासन दिल्याने आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली आता कडक कार्यवाही होणार या भितीने (Sand Mafia) वाळू माफियांचे चांगलेच ढाबे दणाणले आहेत. यावेळी मोठया संख्येने गावकरी उपस्थीत होते.