नायब तहसीलदारांनी केले २५ टिप्पर मोबाईल मध्ये कैद
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Sand Mafia) : रविवार सुट्टीचा दिवस आणि सततधार पाऊस (Heavy rain) सुरू असल्याने कोणताही अधिकारी इकडे येणार नाही. म्हणून वाळू माफियांनी एकमेकात चढाओढ करीत २५ ते ३० टिप्पर घेवून नदी पात्रातून अवैध रेतीची वाहतूक सुरू केली. या घटनेची माहिती वरिष्ठांना लागताच एचडीपिओ बुलढाणा शरद पाटील यांच्या आदेशा वरुण चिखली निवासी नायब तहसीलदार वीर यांनी इसरुळ येथे घटनास्थळी धाव घेतली. परंतु ना. तहसिलदार घटनास्थळी आल्याचे पाहून लगेच टिप्पर चालकांनी वाहनातील (Illegal sand transportation) रेती खाली करून पळ काढला . हा प्रकार नायब तहसीलदार वीर यांनी त्यांच्या मोबाईल फोन मध्ये कैद केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
चिखली तालुक्यातील इसरूळ या गावालगत खडकपूर्णा प्रकल्पाचे मोठे नदी पात्र आहे. नदी पात्रातून मोठया प्रमाणावर अवैध रेतीची वाहतुक चोरट्या मार्गाने सुरू असते. महसुल व पोलीस प्रशासन हे चोरटया मागाने चालणा-या अवैध रेती वाहतुक करण्या-यांवर वेळोवेळी कारवाया करीत आहे. मात्र (Chikhali Sand Mafia) वाळू माफिया हे कोणत्याही कार्यवाहीला न घाबरता सातत्याने अवैध रित्या रेती उपसा करून वाहतूक करतात . एकीकडे शासनाने खडकपूर्णा नदी पात्रातून रेतीचा लिलाव केला नसल्याने रेतीची वाहतूकीला बंदी आहे. परंतु वाळू माफिया हे रात्री ८ च्या नंतर रात्रभर रेतीचा उपसा करून रेतीची वाहतूक करतात. त्यातच गेल्या काही दिवसापूर्वी महसूल प्रशासन नजर ठेवून रेती माफियावर कडक कार्यवाही केली होती.
तरी सुध्दा रविवार सुट्टीचा दिवस आणि सततधार पाऊस सुरू असल्याचे पाहून आता इकडे कोणताही अधिकारी येणार नाही. म्हणून वाळू माफियांनी अवैध रेती वाहतूक करण्यासाठीं चक्क २५ ते ३० टिप्पर नदी पात्रात उतरविले यांची गुपीत माहिती एचडीपिओ बुलढाणा शरद पाटील यांना मिळाली असता लगेच (Chikhali Tehsildar) चिखली निवासी नायब तहसीलदार वीर यांना आदेश देवून घटनास्थळी पाठविले. ना तहसिलदार यांनी इसरुळ येथे घटनास्थळी धाव घेतली. परंतु ना. तहसिलदार घटनास्थळी आल्याचे पाहून लगेच टिप्पर चालकांनी वाहनातील रेती खाली करून पळ काढला. हा प्रकार नायब तहसीलदार वीर यांनी त्यांच्या मोबाईल फोन मध्ये कैद केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र (Chikhali Sand Mafia) कडक कार्यवाही करूनही यापाठीमागे कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने नियम धाब्यावर ठेवून हा गोरख धंदा सातत्याने चालू आहे असा सवाल सामान्य जनतेला पडला आहे.