गावाकऱ्याकडून मदतीचे आवाहन
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Short circuit) : तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील अतिशय हालालकीची परिस्थिती मध्ये आपल्या कुंटूबांचा उदरनिर्वाह चालवीत असलेले प्रल्हाद दगडूजी खेडेकर यांच्या घराला सॉर्ट सर्किट (Chikhali Short circuit) होवून आग लागली त्यामध्ये त्यांच्या घराचा कोळसा होवून गेला असून या कुंटूंबाला उघडडयावर येण्याची वेळ आली आहे. झालेली नुकसान पाहून गावाकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे 33 केव्ही उपकेंद्र आहे या उपकेंद्रा अंतर्गत अंत्री खेडेकर येथील दगडूजी खेडेकर यांच्या कडे विद्युत मीटर आहे त्यांची तीन असून एकत्र राहतात. त्यामध्ये त्यांचा मुलगा प्रल्हाद खेडेकर हा त्यांच्या मुलाबाळा सह घरातच पाठीमागून राहतो. त्यांची पत्नी प्लॉट च्या कामाला सकाळीच घरातील कामे आटोपून शेतात गेली होती. आणि पल्हाद खेडेकर व त्यांची दोन्ही मुले बाहेर होती तेवढ्यात अचानक घरामध्ये वायरींगचा (Chikhali Short circuit) शॉर्ट सर्किट झाला आणि 15 मिनिटातच घराणे मोठा पेट घेतला शेजारी लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला होता मात्र आग विझविता आली नाही.
संपूर्ण घराचा कोळसा झाला ही आग स्वयंपाक घरातच (Chikhali Short circuit) लागल्याने स्वयंपाक घरातील सर्व खाद्य पदार्थ, तथा समोरच्या खोलीतील सोपा, दिवाण, कपडे, कुलर, फ्रिज, शालेय पुस्तके, अंगावरील कपडे टिव्ही, तथा आदी लाखोचे नुकसान झाले. हा प्रकार पाहून हे रोज मजुरी करणारे कुंटूब उघड्यावर आले आहे. या घटनेची माहिती गावातील ग्रा. प. सदस्य भिका पाटील, संजय खेडेकर, राजु खेडेकर यांनी महसूल विभागाचे तलाठी यांना दिली मात्र त्यांनी निवडणुकीचे नाव सांगून येण्यास ताळले. मात्र ग्रामसेवक आणि कोलवाल यांनी पाहणी करुण अहवाल तहसीलदार यांना पाठवू असे सांगण्यात आले. तसेच गावकरी महिलांनी या कुंटूबास खाद्य पदार्थ दिले तर नेहरू विद्यालयाच्या सोनिया राम खेडेकर यांनी या कुंटूबास मोठा आधार देऊ असे सांगितले.