तहसीलदारांचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali tahsil Office) : इसरुळ येथील माजी सरपंच पती संतोष भुतेकर यांनी जिल्हाधिकारी आणि (Chikhali tahsil) चिखली दे राजा तहसिलदार यांच्या बदनामीचा चित्रीकरण व्हिडिओ प्रसार समाजमाध्यमावर वायरल केला होता. या बाबत तहसिलदार यांनी नोटीस काढूण दोन दिवस खुलासा द्यावा. यासाठी तहसील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते मात्र माजी सरपंच यांनी तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित तारीख वर हजर झाले नाही त्यामुळे तहसिलदार यांनी भुतेकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे फर्माण निवासी नायब तहसीलदार वीर यांना सोडले आहे.
चिखली तहसिलदार (Chikhali tahsil) यांनी तक्रारी मध्ये नमूद केले आहे की संतोष भुतेकर रा. ईसरुळ अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत समाजमाध्यमावर एक चित्रफित (व्हिडीओ) प्रसारीत होत आहे. सदर चित्रफितीमध्ये ते अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत मा. जिल्हाधिकारी बुलडाणा व महसूल प्रशासनावर अशासकीय भाषेत टिपणी करीत असल्याचे दिसुन येत आहे.सदर प्रकरणी त्यांचे म्हणने मांडण्यासाठी दिनांक ११ जुलै रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयास हजर राहण्याबाबत संबंधीतास सुचित करण्यात आले होते.
सदर दिवशी ते हजर झाले परंतु, प्रशासकीय कारणामुळे प्रकरणात सुनावणी घेता न आल्याने प्रकरणात पुनःश्व दिनांक १५ जुलै रोजी सुनावणी ठेवण्यात आली. परंतु सदर दिवशी संबंधीत गैरअर्जदार हजर झाले नाही. तसेच याबाबत त्यांचे म्हणने आजपावेतो या कार्यालयास सादर केले नाही. त्यामुळे संतोष भुतेकर हे जाणिवपुर्वक प्रशासनाची बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटे संभाषण समाजमाध्यमावर प्रसारीत करीत असुन याबाबत त्यांचे काही म्हणने नसल्याचे दिसुन येते.
करीता संतोष भुतेकर, रा. ईसरुळ ता. चिखली जि. बुलडाणा यांचेविरुध्द जाणिवपूर्वक प्रशासनाची बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटी चित्रफित (व्हिडीओ) समाजमाध्यमावर प्रसारीत केल्याप्रकरणी संबंधीत पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 356(2), 356(3), 135 नुसार गुन्हे दाखल करण्यासाठी निवासी (Chikhali tahsil) नायब तहसीलदार वीर यांना याव्दारे प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणत्या वळणावर जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.