दि. चिखली अर्बन बँकेच्या सर्वसाधारण सभा
बुलडाणा (Chikhali Urban Bank) : आर्थिक क्षेत्रात काम करताना सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा (Jevan Gaurav Award) गौरव गेल्या 2007 पासून सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली दि चिखली अर्बन को-ऑप बँक (Chikhali Urban Bank) करत आहे. आज रविवार 11 आगस्ट रोजी चिखली येथे रानवारा परिसरात पार पडलेल्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Pardhi community) पारधी समाजाच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या युवराज पवार (Yuvraj Pawar) यांना बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, प्रदीपज वडनेरकर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
दि चिखली अर्बन को-ऑप बँक लि. चिखलीच्या (Chikhali Urban Bank) सर्वसाधारण सभेत सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी मंचावर बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांचेसह आ. सौ.श्वेताताई महाले पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले, प्रदीप वडनेरकर, युवराज रामसिंग पवार, सौ.रत्नाताई युवराज पवार, पुरुषोत्तम दिवटे, विश्वनाथ जीतकर, राजेंद्र शेटे, गणेश मांन्टे, सौ. सुनीताताई भालेराव ,जीवन सपकाळे, मनोहर खडके, सुधाकर कुलकर्णी, डॉ.राजेंद्र भाला, सुशील शेटे, शैलेश बाहेती, श्यामसुंदर पारिख, सौ. मंजुताई कोठारी,राजेश व्यवहारे,आनंदी जेठांनी, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष रामदास बिडकर, सदस्य अशोक पाटील, डॉ.आशुतोष गुप्ता, माजी संचालक रामकृष्णदादा शेटे, प्रेमराजशेठ भाला, विजय कोठारी, दादाराव तुपकर, विलास सावजी, माई भवर, सरलाताई भवर, सुशील ओस्थावाल, सरव्यवस्थापक शशांक पंधाडे, कर्मचारी प्रतिनिधी अरविंद सुरंगळीकर, प्रकाशबुवा जवंजाळ, पंडितराव देशमुख व शाखा सल्लागार हे प्रामुख्याने उपस्थित होते.
समाज उन्नतीसाठी आर्थिक, शैक्षणिक, सहकार, अध्यात्मिक, वैज्ञानिक, क्रीडा यामध्ये अलौकिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व (Chikhali Urban Bank) संस्थांचा बँक “जीवन गौरव पुरस्कार” (Jevan Gaurav Award) देऊन सन्मान करते. यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार हा पारधी समाजासाठी अहोरात्र झटून समाजातील तळागाळातील घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणारे युवराज रामसिंग पवार यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सतीश गुप्त म्हणाले की, केवळ नफा आणि बँकेची प्रगती हे डोळ्यासमोर न ठेवता आपले समाजाप्रती असलेले देणे हे बँक कधीच विसरली नाही. महिला स्वावलंबी होण्यासाठी व महिला सबलीकरण करण्याकरिता बचत गटाची स्थापना करून त्यांना कर्जपुरवठा करत आहे. आजपर्यंत ३५००० पेक्षा जास्त महिलांना बचत गटाच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. बँकेचे ठेवीदार, खातेदार, कर्जदार आणि सभासदांच्या सहकार्याने चिखली अर्बन बँकेने (Chikhali Urban Bank) आर्थिक क्षेत्रात सर्वांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रामाणिक कामामुळे बँकेची घोडदौड आज वेगाने सुरू आहे.
31 शाखा व ग्राहक सुविधा केंद्र असलेली चिखली अर्बन बँक (Chikhali Urban Bank) आज 63 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आपण दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर बँकेची ही यशस्वी व नेत्रदिप वाटचाल सुरू आहे.यानंतर फासेपारधी समाजासाठी कार्य करणारे युवराज पवार, विद्याधर महाले व प्रदीप वडनेरकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. बँकेचे तज्ञ संचालक आनंद जेठानी यांनी अहवाल वाचन केले. सभेमध्ये तलवारबाजीत गोल्ड व कांस्यपदक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दहावीत उत्तीर्ण सभासदांच्या पाल्यांना व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. सुजीत दिवटे यांनी सूत्रसंचालन तर जीवन सपकाळे यांनी आभार मानले.