देशोन्नती वृत्तसंकल
चिखली/बुलढाणा (Chikhali Youth suicide) : ३८ वर्षीय तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास घेवून आत्महत्या (Youth suicide) केली. ही घटना मेरा खुर्द येथे सकाळी उघडकीस आली. अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा खुर्द येथील रहिवाशी असलेले शंकर रामभाऊ जंगले हे ॲटो चालवून कुंटूबांचा उदरनिर्वाह चालवत होते. गेल्या काही वर्षांपूर्वी शंकर जगले यांच्याकडून अपघात झाला होता. त्या (Chikhali Accident) अपघात प्रकरणात त्यांना जमिन व जागा विकून फार मोठा खर्च भरून द्यावा लागला होता. त्यामुळे त्याच्यावर कर्जबाजारी पणाचा डोंगर उभा राहिल्याने त्यांना दारुचे व्यसन लागले.
मेरा खुर्द येथे घडली घटना
आता जमिन नाही आणि कर्जही झाले. म्हणून मुलांचे शिक्षण व घरखर्च कसा चालवावा. हा मोठा प्रश्न त्यांना नेहमी सतावत होती. याच नैराश्यपायी शंकर जगले यांनी रात्रीला घरात सर्व झोपले आहे. हे पाहून त्यांनी स्वत: च्या घरातच टिनपत्रा खालच्या लोखंडी अँगलला रुमालच्या साह्याने गळफास घेवून (Youth suicide) आत्महत्या केली. हा प्रकार त्यांच्या पत्नीला पाहिला आणि आरडा ओरडा सुरू केला. त्यामुळे गावकरी जमा झाले आणि लगेच (Chikhali Police) पोलीस पाटील ठाकूर यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. भागवत रमेश जंगले यांच्या लेखी जबाब वरुण ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार कैलास उगले यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचसमक्ष पंचनामा करून कलम १७४ नुसार मर्ग दाखल केला. मात्र या (Chikhali Youth suicide) घटनेमुळे लहान मुला मुलीवरचे वडिलाचे छत्र हरपले असल्याने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.