निवडणूक नोडलं अधिकारी वीर यांची चेक पोस्टला भेट
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhli Assembly Election) : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिखली तालुक्यातील एंट्री पॉईन्टवर वाहनांची तपासणी करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामध्ये (Chikhli Assembly Election) निवडणूक नोडलं अधिकारी तथा निवाशी नायब तहसीलदार वीर यांनी अचानक भेटी देऊन स्थिर पथकास आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सुचना दिल्या.
चिखली निवडणूक अधिकारी पोळ तसेच चिखली तहसीलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली (Chikhli Assembly Election) निवडणूक नोडलं अधिकारी वीर यांनी आज सर्वप्रथम भानखेड येथील चेक पोस्टला अचानक भेट देऊन पाहणी केली असता उपस्थित कर्मचारी हे येणाऱ्या जाणाऱ्या लहान मोठया वाहणाची तपासणी करतांना दिसलें तसेच एसएसटी पथकांसह कामकाजांची पाहणी करून कामकाजाची माहिती जाणून घेऊन वाहन नोंदवहीचीही तपासणी केली अशा कामकाजाबाबत नोडलं अधिकारी वीर यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी पथक प्रमुख अभय पाटील,राजेंद्र वाघमारे, सहाय्य्क अमोल मगर, गजानान इंगळे, पोलीस कर्मचारी संतोष शेळके, कॅमेरामॅन प्रेम गवई, उपस्थित होते.