मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची समर्थकांसह घेतली भेट
बुलडाणा (Chikhli Assembly Election) : चिखली विधानसभा मतदारसंघ (Chikhli Election) हा नेहमीच विविध प्रकारच्या कारणांमुळे चर्चेत असतो. यामुळे या मतदारसंघातून (Buldhana Congress) कांग्रेसच्या तिकीटावर राहुल बोंद्रे हे एकमेव प्रबळ दावेदार वाटत असतांना, जिल्हा परिषदचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अंकुशराव वाघ यांनी दावेदारी सांगत आपल्या समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची (Nana Patole) भेट घेतल्याने मतदारसंघात निवडणुकीआधीच तापमान वाढले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपतर्फे श्वेता महाले (Shweta Mahale) या नवख्या महिला उमेदवारांने कांग्रेसच्या दिग्गज राहुल बोंद्रे यांचा सुमारे साडे सात हजार मतांनी पराभव केला होता. यावेळी कांग्रेससाठी सहानुभूतीची लाट असलीतरी सामाजिक समिकरण बघता या मतदारसंघातून (Shweta Mahale) श्वेताताई महाले यांचे पारडे जड वाटते. यालाच शह देण्यासाठी (Buldhana Congress) कांग्रेस कडून तूल्यबळ मराठा उमेदवार देण्यात आल्यास समीकरण बदलू शकते. त्यामुळे अंकुशराव वाघ हे या समिकरणात फीट बसू शकतात. त्यामुळे अंकुशराव वाघ यांच्या समर्थकांनी आतापासूनच तयारी सुरु केली असल्याने पक्षश्रेष्ठीकडून त्यांना तशी तयारी करण्यासाठी सांगण्यात आले असू शकते. त्यामुळे तसे झाले तर (Chikhli Election) चिखली विधानसभा मतदार संघातील निवडणूक ही चुरशीची होऊ शकते.