देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली (Chikhli Assembly Elections) : चिखली विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहण्याची राहण्यासाठी इच्छुकांची अर्ज लिहिण्यासाठी झुंबड उडाली आहे. आतापर्यंत 67 इच्छुकांनी 114 अर्ज निवडणूक विभागाकडून नेले आहेत.
चिखली विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणूक 2024 साठी (Chikhli Assembly Elections) उमेदवारांची भाऊ गर्दी होण्याची चिन्हे दिसून येत आहे कारण आतापर्यंत 67 इच्छुक उमेदवारांनी 114 अर्ज निवडणूक विभागाकडून नेले आहेत आणि अजूनही चार दिवस उमेदवारी अर्ज भरण्याला वेळ असल्याने आणखीन किती इच्छुक तयार होतात हे आता येणाऱ्या काळात दिसून येईल जसजशी विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याची तारीख जवळ येत आहे तसं तसे उमेदवारी अर्ज नेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने येत्या निवडणुकीत उमेदवारांची भाऊ गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही एवढे मात्र खरे –
तालुका प्रतिनिधी चिखली