उदयनगर उपबाजार आवारात इंडीयन ऑईल पेट्रोलपंप होणार सुरू
देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Chikhli Bazar Samiti) : चिखली कृषि उत्पन्न बाजार समिती अतंर्गत उदयनगर उपबाजार आवाराचे जागेत इंडियन ऑईल कार्पोरेशन पंपाचे भुमिपुजन मा.आ.सौ. रेखाताई खेडेकर यांचे अध्यक्षतेखाली मा. आ. राहुल बोंद्रे यांचे शुभहस्ते विशेष उपस्थिती मध्ये सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार माजी मंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्रजी खेडेकर शेतकरी संघटनेचे नेते एकनाथजी थुट्टे व बाजार समितीचे सभापती, उपसभापती संचालक मंडळ तसेच आजी माजी सभापती, उपसभापती, संचालक, मुख्यप्रशासक, प्रशासक, समितीचे प्र.सचिव. रमेश शेटे व उदयनगर परिसरातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तथा शेकडो शेतकऱ्यांचे उपस्थितीत पार पडला.
यावेळी आपल्या प्रास्तविकात समितीचे सभापती डॉ. संतोषराव वानखडे यांनी सदर पेट्रोल पंपासाठी समितीने केलेल्या प्रयत्नां बाबत सविस्तर माहिती दिली. सदर पेट्रोल पंप सुरु करण्याकरिता येणाऱ्या अडचणी सांगितल्या व त्यावर मात करुन त्यांनी सदर पेट्रोल पंप कश्या प्रकारे मंजुर करुन घेतला या बाबत सांगितले. तसेच (Chikhli Bazar Samiti) चिखली तालुक्यातील बळीराजा शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटिबध्द राहु असे सांगुन आपले प्रास्ताविक संपविले.
यावेळी मा. आ. राहुल बोंद्रे यांनीही आपले मार्गदर्शपर भाषणात सांगितले की, (Chikhli Bazar Samiti) चिखली बाजार समितीच्या संचालक मंडळाने उदयनगर येथील पेट्रोल पंपासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच बाजार समितीच्या या उपक्रमामुळे एक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होऊन बाजार समितीसाठी आवश्यक असलेल्या पायाभुत सोई सुविधेसाठी आर्थिक स्थिती सक्षम करुन कर्मचाऱ्यांचा पगाराचा खर्च व इतर प्रशासकीय खर्च माध्यमातुन भागवीणे सोईचे होईल. संचालक मंडळाचे या कामाचे कौतुक केले आहे. यावेळी अध्यक्षीय भाषणात मा.आ.सौ. रेखाताई खेडेकर यांनी पेट्रोलपंपाचा उपक्रम स्तुत्य असुन परिसरातील जनतेला याचा फायदाच होणार आहे.
याप्रसंगी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी विष्णु पाटील कुळसुंदर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले व आयोजकाचे वतीने बाजार समितीचे उपसभापती रामेश्वर खेडेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानुन पेट्रोलपंप लवकरात लवकर कार्यान्वीत करण्याचे आश्वासन देवुन भुमिपुजन कार्यक्रमाची सांगता केली.