देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhli Crime) : शेत धुऱ्याच्या बांधावर गवत का टाकले अशा शुल्लक कारणावरून आरोपीने गैरकायद्याची मंडळी जमुन तुंबळ हाणामारी केली अशी तक्रार समाधान पुंजाजी मानेकर वय ५० वर्ष यांच्या तक्रारी वरुण अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली (Chikhli Police) पोलीसांनी २ ऑक्टोबर रोजी नायगाव येथील नऊ लोकावर विविध कलमान्वये गंभीर स्वरुपाचे( Chikhli Crime) गुन्हे दाखल केले आहेत.
अंढेरा पोलीस स्टेशन (Andhera Police Station) अंतर्गत येणाऱ्या नायगाव येथील समाधान पुंजाजी मानेकर वय ५० वर्ष यांनी तक्रारी मध्ये नमूद केले आहे की शेतात फिर्यादीचे भाऊ व भावजय आणि पुतण्या हे शेतात काम करीत असताना आरोपी याने शेतीच्या धुरावर गवत टाकले असता यातील फिर्यादीची भावजय व पुतण्या हे आरोपीतास म्हणाले की तुम्ही शेतातील धुरावर गवत टाकू नका असे म्हणाले असता आरोपी म्हणाला की येथेच गवत टाकीन असे म्हणून त्याच्यासोबत वाद सुरू झाला आणि आरोपीने गैर कायद्याचे मंडळी जमून शेतातील बांधावरुन वाद घालून संगणमताने त्याच्या हातातील काठी व लोखंडी रॉड आणि विळयाने फिर्यादीचा भाऊ, भावजय, पुतण्या त्यांच्या डोक्यात पाठीवर हातावर मारून (Chikhli Crime) गंभीर जखमी केले.
तसेच फर्यादीचा मुलगा हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्याला सुध्दा आरोपीनी काठीने डोक्यात व पाठीवर मारून गंभीर जखमी करून शिवगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या हाणामारीत जखमी हे जालना दवाखान्यातून उपचार घेवून आले आणि (Chikhli Police Station) पोलीस स्टेशनला येवून तक्रार दाखल केली. या तक्रारी वरुण ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सिध्दार्थ सोनकांबळे यांनी आरोपी आरोपी गणेश भानुदास मुंढे , लिंबाजी भानदास मुंढे , भागवत अंबादास मुंढे , देवानंद गणेश मुंढे , रुक्मिणीबाई गणेश मुंढे, बेबी लिंबाजी मुंढे, स्वाती भगवान मुंढे, भानुदास सखाराम मुंढे , राहणार नायगाव , आणि लक्ष्मण अर्जुन कायदे रा. शिवणी आरमाळ या नऊ आरोपी विरुध्द कलम ११८(२),११८(१),२९६,३५२,३५१,(३),१८९,(२/,२९१(२), १९०, BNS प्रमाणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.