देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली (Chikhli Crime) : चिखली पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावातील आठवी ते दहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुली श्री शिवाजी शाळेतून बस स्टँड कडे येताना अन्वी येथील एक ऑटोवाला त्या मुलींना सतत आठ ते दहा दिवसापासून टॉर्चर (Chikhli Crime) करत होता. त्या गावातील चार-पाच मुलींच्या पालकांनी 26 सप्टेंबर रोजी त्याच्यावर पाळत ठेवली आणि मुलींनी तो ऑटो दाखवताच त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो अटो सोडून पळून गेला त्या पालकांनी तो अटो सायंकाळी (Chikhli Police) चिखली पोलीस स्टेशनला आणून जमा केला आहे.
चिखली शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावातील मुली चिखली येथे श्री शिवाजी शाळेमध्ये येतात जेमतेम त्या मुली आठवी ते दहा वर्गातील असतील त्यामुळे मुली शाळा सुटल्यानंतर शिवाजी शाळेपासून गावी जाण्यासाठी बस स्टँड कडे येत असतात मात्र अन्वी येथील एक चिडीमार सतत आठ ते दहा दिवसांपासून त्यांच्या मागे अटो घेऊन यायचा अटोत बसा, माझ्यासोबत चला, सोडून देतो , असे वेगवेगळे बहाने करून अश्लील हावभाव दाखवून मुलींना अटोत बसवण्यासाठी टॉर्चर (Chikhli Crime) करत होता त्या चार-पाच मुलींनी ते सात आठ दिवस सहन केले आणि या त्रासाला कंठाळून ही घटना घरी पालकांना सांगितली पालकांनाही वाटले एखादा अटोवाला असेल रस्त्याने जाताना मुलीना सोडून देतो म्हणत असेल असे समजून दुर्लक्ष केले.
मात्र ऑटो चालकाचा छळ जास्त वाढल्याने मुलींनी शाळेतच न जाण्याचा पवित्र घेतल्यानंतर 26 सप्टेंबर रोजी संबंधित चार-पाच पालकांनी शाळा सुटल्यानंतर शाळेजवळ येऊन मुलींना विचारले असता मुलींना त्याचे नाव माहीत नव्हते मात्र मुली त्याला पाहिल्यानंतर ओळखत होत्या अआठ दहा दिवसापासून ठरल्याप्रमाणे मुली शाळा सुटल्यानंतर बस स्टँड कडे येत असतानाच नित्याप्रमाणे आटोवाला मुलींना टॉर्चर (Chikhli Crime) करण्यासाठी आला तेवढ्यात मुलींनी त्यांच्या वडिलांना तो दाखवला असता त्या पालकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऑटो सोडून फरार झाला त्या पालकांनी सदर ऑटो (Chikhli Police) चिखली पोलीस स्टेशनला जमा केला आहे.
सदर घटना पालकांनी (Chikhli Police) पोलीस निरीक्षक संग्रामसिंह पाटील यांना सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ वाहतूक शाखेच्या पोलिसांना सूचना देऊन आणि डीबी पथकाला रण करून त्याला शोधण्याकामी कामाला लावले आहे. ऑटो वरून सदर चिडीमार हा आन्वी येथील असल्याचे कळाले आहे.




