कक्ष अधिकारी बनले रखवालदार, आर्थिक व्यवहार कामे रखडले
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलडाणा (Chikhli Panchayat Samiti) : जिल्हा प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे (Chikhli Panchayat Samiti) चिखली पंचायत समितीला गेल्या पाच वर्षांपासून कायमस्वरूपी गटविकास नाही त्यात गेल्या दोन महिन्यापूर्वी एका अधिकाऱ्यांनी पदभार घेतला होता. मात्र तेही सुध्दा रजेवर गेले त्यामुळे तालुक्यांतील विकास कामे रखडली आहेत.
जिल्हयात ( अ ) दर्जा प्राप्त असलेल्या चिखली पंचायत समिती मध्ये जनतेची कामे वेळेवर व्हावी तसेच कोणालाही त्रास सहन करावा लागणार नाही यासाठी या पंचायत समितीला दोन गटविकास अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे . परंतु गेल्या काही वर्षांपासून चिखली तालुक्यात राजकीय वातावरण चिघळल्याने गेल्या सहा वर्षांपासून एका पाठोपाठ १७ प्रभारी बिडीओनी पदभार घेतला आणि चार ते पाच महिन्यातच सोडून दिला जात आहे. त्यामुळे या (Chikhli Panchayat Samiti) चिखली पंचायत समितीला कायमस्वरूपी काम करण्यास एकाही बिडीओ अधिकाऱ्याची भूमिका राहिली नाही. या प्रकारामुळे पंचायत समिती अंतर्गत विकास कामे , शासकीय कामे रखडली आहेत. कामकाज सुरळीत चालावे म्हणून प्रशासनाने तीन महिन्यापूर्वी प्रभारी बिडीओ म्हणून एल पी सुरडकर यांच्याकडे पदभार सोपाविला.
त्यांनी एक महिनाभर कामकाज सांभाळत असतांना त्यांना फार त्रास सहन करावा लागला मात्र अचानक त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांना रजा घेण्याची सवड मिळाली. आणि आता या (Chikhli Panchayat Samiti) पंचायत समितीला १० सप्टेंबर पासून गटविकास अधिकारीच नसल्याने या कक्ष अधिकारी काळे यांच्या कार्यालयांची रखवाली करण्याची वेळ आली आहे. मात्र गटविकास अधिकारी यांच्या रेकॉर्डवर स्वाक्षऱ्या लागत असल्याने तालुक्यांतील विकास कामाला ब्रेक बसला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे तात्काळ दखल घेवून चिखली पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी यांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.